Swiggy वर तुम्ही आतापर्यंत किती पैसे उडवले? या Trick नं लगेच पाहा

किती पैसे खर्च होतायत.... धक्काच बसेल. 

Updated: Sep 2, 2022, 12:07 PM IST
Swiggy वर तुम्ही आतापर्यंत किती पैसे उडवले? या Trick नं लगेच पाहा title=
this is how you can fing how much amount youve spend on Swiggy online food

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कोविड काळात (Corona wave) हे प्रकरण जरा जास्तच प्रचलित झालं. यातच ऑनलाइन फूड डिलीवरी अॅपनं (online food delivery) आपल्या आयुष्यात महत्त्वाची जागा तयार केली. मग ते Swiggy असो किंवा Zomato. 

तुम्ही आतापर्यंत एकदातरी अशा कोणत्यातरी अॅपवरून जेवण किंवा कोणताही खाद्यपदार्थ मागवला असेल. काहींनी तर दर दिवसाआड इथून काहीतरी मागवलं असेल. अतिशयोक्ती वाटेल पण अशी मंडळीही आहेत बरं. (this is how you can fing how much amount youve spend on Swiggy online food )

आपण बाहेरच्या खाण्यावर, Swiggy वर आतापर्यंत किती खर्च केलाय याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केलाय का? एकदा हे आकडे तुमच्या समोर आले, तर धक्काच बसेल. 

पाहा कशी मिळवाल तुम्ही खर्च केलेल्या पैशांची माहिती... 
- सर्वप्रथम डेस्कटॉप/पीसी सुरु करा. तिथं ईमेल किंवा फोन नंबर वापरून लॉगईन करा. 
- आता उजव्या कोपऱ्यात तुमचं नाव टाईप करा. 
- यानंतर Orders वर क्लिक करा आणि त्या पेजच्या खालच्या भागात Show More orders या पर्यायावर Click करून खाली स्क्रोल करा. 
- तुम्ही जेव्हा Order History च्या शेवटास पोहोचाल तेव्हा माऊसवरून Righ Click करा आणि Inspect पर्याय निवडा. 
- आता पेजवर दिलेल्या Console या पर्यायावर क्लिक करा. 
- खाली दिलेल्या कोडला Console मध्ये पेस्ट करून Enter दाबा. 
- तुम्ही एन्टर करताच तिथे सर्व Amount स्पष्ट दिसेल.