iPhone यूजर्ससाठी वाईट बातमी! ऑक्टोबरपासून WhatsApp तुमच्या फोनमध्ये चालणार नाही

तुम्हीही आयफोन वापरता का? 

Updated: Sep 2, 2022, 10:03 AM IST
iPhone यूजर्ससाठी वाईट बातमी! ऑक्टोबरपासून WhatsApp तुमच्या फोनमध्ये चालणार नाही  title=
Shocking WhatsApp will not work on these iPhone models

Shocking News : हातात फोन असणाऱ्या जवळपास सर्वांकडेच WhatsApp Install केलेलं असतं. या एका अॅपनं जगाच्या पाठीवर कुठेही असणाऱ्यांसोबत मॅसेज, Video Call करणं सहज शक्य करून दिलं. पण, आता मात्र हे WhatsApp आयफोनमध्ये चालणार नाहीये. 

तुम्हीही आयफोन वापरता का? ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्त्वाची. कारण, आयफोनच्या काही जुन्या मॉडेल्समध्ये WhatsApp चं अॅप सपोर्ट करणार नाहीये. WABetaInfo करून देण्यात आलेल्या मागील अहवालामध्ये 24 ऑक्टोबरपासून मॅसेजिंग अॅप iOS 10, iOS 11 ला सपोर्ट करणं बंद करेल. (Shocking WhatsApp will not work on these iPhone models)

iPhone 14 च्या 'या' फीचरबाबत माहिती लीक! आयफोनप्रेमींमध्ये उत्सुकता

 

दरम्यान, याआधीच यासंदर्भातील इशारा सदर आयफोन मॉडेल वापरणाऱ्यांना देण्यात आल्याचं व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आलं आहे. 

App नं दिली नोटीस 
सदर माहिती यापूर्वीच  iOS 10, iOS 11 वापरणाऱ्यांना देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ज्यांना हे अॅप वापरणं सुरुच ठेवायचं आहे त्यांनी आयफोन अपडेट करणं अपेक्षित आहे. आय़फोनशिवाय हे अॅप वापरण्यासाठी Android एंड्रॉइड डिवाइस यूजर्सना एंड्रॉइड 4.1 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनची गरज असेल. 

लेटेस्ट iOS Update 
iPhone चं कोणतंही अपडेट तुम्हाला आतापर्यंत आलं नसेल तर, लगेचच ते अपडेट करुन घ्या. यासाठी सेटिंग> जनरल येथे जा, त्यानंतर तिथं लेटेस्ट iOS वर्जन मिळवा आणि Software Update वर क्लिक करा.