Vodafone Idea यूजर्सना मोठा झटका, नक्की काय झालं?

व्होडाफोन-आयडिया गुपचूपपणे कोणत्याही माहितीशिवाय लोकप्रिय पोस्टपेड  Vodafone Idea RedX प्लान बंद केला आहे.

Updated: Oct 25, 2022, 04:18 PM IST
Vodafone Idea यूजर्सना मोठा झटका, नक्की काय झालं? title=

मुंबई : व्होडाफोन-आयडिया  (Vodafone Idea) एक प्रमुख टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. व्ही कंपनीने आतापर्यंत आपल्या यूजर्सना एकसेएक ऑफर दिल्या आहेत ज्याचे दरही परवडणारे आहेत. मात्र कंपनीने यूझर्सना झटका देणारा निर्णय घेतला आहे. कंपनीने अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता अनेक लोकप्रिय आणि जबरदस्त फायदे देणाऱ्या पोस्टपेड प्लान्स, व्होडाफोन आयडिया रेडएक्स प्लान्स (Vodafone Idea RedX Plans) अचानक बंद केला आहेत. यामध्ये कोणत्या कोणत्या प्लान्सचा समावेश आहे, हे जाणून घेऊयात. (telecom cpompany vi vodafone idea remove premium postpaid plan know in details)

व्होडाफोन-आयडिया गुपचूपपणे कोणत्याही माहितीशिवाय लोकप्रिय पोस्टपेड  Vodafone Idea RedX प्लान बंद केला आहे. हा प्लान बंद करण्यामागचे कारण काय होते, याबाबत सध्या काहीही माहिती नाही. हा बदल पहिल्यांदा TelecomTalkने नोटीस केला.   

कंपनीकडून हे प्लॅन बंद

Vodafone Idea RedX प्लॅन्सच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व प्लॅनची ​​किंमत 1 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. यामध्ये एकूण 3 प्लान्सचा समावेश आहे. फ्लॅगशिप REDX पोस्टपेड प्लॅनची ​​किंमत  1 हजार 99 होती. तर उर्वरित 2 फॅमिली पोस्टपेड प्लॅनची किंमत  1 हजार 699 आणि रु 2 हजार 299 मध्ये उपलब्ध होते. मात्र या प्लानसाठी 6 महिन्यांचा लॉक-इन पीरियड फॉलो करावा लागेल.

यापैकी कोणतीही प्लान वापरत असाल तर काळजी करू नका. TelecomTalk नुसार, अनेक यूजर्सनी तक्रार केली आहे की त्यांचे प्लान अॅप आणि वेबसाइटवर दिसत नाहीत. पण सध्या कंपनीकडून याबाबत कोणतेही अपडेट नाही.