नवी दिल्ली : जिओ, एअरटेल आणि वो़डाफोन आयडीया (jio, Airtel, Vodafone Idea)या भारतातील प्रमुख खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्या आपल्या युजर्ससाठी अनेक आकर्षक प्रीपेड आणि पोस्टपेड स्किम्स घेऊन येत असतात. ज्यामध्ये युजर्सला कमी खर्चात जास्त फायदा मिळू शकतो. लवकरच तिन्ही कंपन्या आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये वाढ करणार आहेत. जाणून घेऊया नवीन ऑफर्स...
जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडीयाच्या प्लॅन्सची वाढणार किंमत
लवकरच टेलिकॉम कंपनी, जिओ एअरटेल आणि वोडाफोन आयडीया आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सची किंमत वाढवणार आहे. ऑफर्ससोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन देणार आहे.
किंमत वाढविण्याचे कारण
या विषयाबाबत चर्चा यासाठी होत आहे की, ऍमेझॉन प्राइमने आपल्या व्हि़डिओ सेवेसाठी शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅन्सच्या किंमतीत वाढ होणार आहे. कारण टेलिकॉम कंपन्यांचे प्लॅन्स ऍमेझॉन प्राइम व्हिडिओच्या सब्सक्रिप्शनची सुद्धा सुविधा देते.
ऍमेझॉनने वाढलेल्या शुल्काची अंमलबजावणी करण्याच्या तारखेची अद्याप घोषणा केलेली नाही. जेव्हा ऍमेझॉन प्राइमच्या वाढलेल्या शुल्काची अंमलबजावणी सुरू होईल. तेव्हा टेलिकॉम कंपन्यादेखील प्लॅन्सचे शुल्क वाढवू शकतात.