Loan, Credit cardसाठी येणाऱ्या कॉल्सला तुम्ही वैतागले आहात? मग ही Trick एकदा वापरा

तुम्ही अगदी काही वेळात अशा कॉल्सला किंवा नंबरला ब्लॉक करू शकता.

Updated: Jul 23, 2021, 05:16 PM IST
Loan, Credit cardसाठी येणाऱ्या कॉल्सला तुम्ही वैतागले आहात? मग ही Trick एकदा वापरा title=

मुंबई : जेव्हा आपण काही महत्वाचे काम करत असतो तेव्हा आपल्याला Unknow नंबरवरुन एक कॉल येतो आणि जेव्हा आपण आपल्या कामाच्या गडबडीत असे कॉल घेतो तेव्हा आपल्याला समोरून आवाज येतो, हॅलो सर/ मॅडम तुम्हाला कर्ज पाहिजे का? किंवा तुम्हाला क्रेडिट कार्ड हवं आहे का? असे कॉल ऐकून कोणाला ही रागही येतो आणि मग आपण रागाने फोन ठेवतो. त्याबरोबर आपल्याला अनेक प्रकारचे कंपनीचे मॅसेज देखील येत असतात. जे त्रासदायक असतात. तुम्हाला जर असे कॉल किंवा मॅसेज येत असतील आणि तुम्हाला ते तुमच्या फोनवर नको यायला हवे असतील तर, तुम्ही अगदी काही वेळात अशा कॉल्सला किंवा नंबरला ब्लॉक (How To Block Spam Calls) करू शकता. आज आम्ही तुम्हाला स्पॅम कॉल आणि मॅसेज कसे ब्लॉक करू शकता येणार हे सांगणार आहोत.

ब्लॉक करण्याचा पहिला मार्ग

1. तुमचा फोन उघडा आणि रिसेंट कॉलवर जा.
2. कॉल यादीमध्ये त्यानंबरला निवडा ज्याला तुम्हाला स्पॅम यादीत टाकायचे आहे.
3. त्यानंतर ब्लॉक / रिपोर्ट स्पॅम वर क्लिक करा.
4. त्यानंतर नंबर ब्लॉक केला जाईल आणि तुम्हाला त्या नंबरवरून कधीही कॉल येणार नाही.

ब्लॉक करण्याचा दुसरा मार्ग

तुम्ही हे कॉल तुमच्या टेलीकॉम कंपनीकडून बंद करु शकता, याचे दोन मार्ग आहेत. याला तुम्ही SMS किंवा कॉलद्वारे ब्लॉक करू शकता. आपण मेसेजिंग अ‍ॅपवर जा. नवीन संदेश उघडा आणि START 0 टाइप करा आणि 1909 वर पाठवा. तर आपल्या नंबरवर आपल्याला स्पॅम कॉल मिळणार नाहीत.

आपण कॉलद्वारे देखील स्पॅम कॉल ब्लॉक करू शकता. आपल्या फोनवर 1909 वर कॉल करा. फोनवरील सूचनांचे अनुसरण करा आणि Do Not Disturb पर्याय सक्रिय करा. (How To Block Spam Calls)