मुंबई : पदवीधर आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. टेक महिंद्रा येत्या ३ महिन्यात ४००० नव्या नोकऱ्या देणार आहे. ही सुवर्णसंधी फ्रेशर्ससाठी उपलब्ध आहे. टेक महिंद्राचे मुख्य वित्त अधिकारी मनोज भट यांनी अलिकडेच सांगितले की, या वित्त वर्षात पहिल्या तीन महिन्यात कंपनीने पहिल्या १८०० फ्रेशर्सची नियुक्ती केली आहे.
पुढे ते म्हणाले की, पुढील ३ महिन्यात आम्ही सुमारे ४००० लोकांची नियुक्ती करू. सध्या माझ्याकडे निश्चित आकडा उपलब्ध नाही. पण यात साधारण थोडाफार फरक असेल.
मुंबईतील कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या जून २०१८ च्या पहिल्या तीन महिन्याच्या शेवटापर्यंत 1,13,552 होती. ही संख्या गेल्या तीन महिन्याच्या तुलनेत ७४५ हून अधिक आहे. कंपनीच्या सॉफ्टवेअर विभागात 72,462, बीपीओत 34,700 आणि सेल्स-सपोर्टमध्ये 6,390 लोक कार्यरत आहेत.
कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांची नोकऱ्या सोडल्याच्या विषयावर भट बोलले की, महत्त्वपूर्ण आणि प्रतिभावान लोक गेल्याने आम्ही नक्कीच चिंतेत आहोत. पण यामुळे कंपनीच्या कामावर कोणताही प्रभाव पडलेला नाही.
स्टॉफ सलेक्शन कमीशन (SSC)ने 54,953 पदांवर भरती करणार असल्याचे जाहिर केले आहे.
या नियुक्त्या कॉन्सटेबल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF), सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF), सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्स (CRPF), इंडो तिब्बतन बॉर्डर पुलिस (ITBP), सशस्त्र सीमा बल (SSB), नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी (NIA) आणि सेक्रेटरेट सिक्युरिटी फोर्स (SSF) मध्ये केल्या जातील. याशिवाय असम रायफल्समध्ये रायफलमॅन (जनरल ड्यूटी) पदासाठी देखील भरती सुरु करण्यात आली आहे. संबंधित पदांसाठी २१ जुलैला रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरु झाली आहे.