Tata Nexon Becomes Top Selling Car Of India: वर्षाच्या अखेरीस भारतीय कार बाजारपेठेत मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. यंदा मारुती स्विफ्ट, ब्रेझा या दमदार गाड्यांना मागे टाकत टाटा नेक्सॉन भारतीयांची पहिली पसंती ठरली आहे. 2023मध्ये टाटाची नेक्सॉन सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीत जागा मिळवली आहे. या कारची किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घ्या.
मागच्या डिसेंबरमध्ये टाटा नेक्सॉन एसयूव्ही सगळ्यात जास्त विक्री झालेली कार ठरली आहे. या कारचे मारुतीचे टॉप सेलिंग सीडान (Dzire) डिजायरसोबतच टाटा पंच, एर्टिगा, मारुती ब्रेझा, मारुती स्विफ्ट, महिंद्रा स्कॉर्पिओ, मारुती बलेनो, ह्युंदाई व्हेन्यू आणि मारुती ईको बीटिंग सेगमेंट (मारुती ईको) सारखी सर्वोत्तम कारना मागे टाकले आहे.
मागील महिन्यात, म्हणजेच डिसेंबर 2023मध्ये टाटा नेक्सॉनला 15,284 ग्राहकांनी खरेदी केले आहे. तर, डिसेंबर 2022 मध्ये नेक्सॉनचे 12,053 युनिट्सची विक्री झाली आहे. अशा परिस्थितीत या सब-4 मीटर कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या विक्रीत दरवर्षी 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असले तरीही Nexon च्या मासिक विक्रीत थोडीशी घट झाली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये 15,311 लोकांनी ही कार खरेदी केली आहे.
देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV Tata Nexon ची सध्याची एक्स-शोरूम किंमत 8.10 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.50 लाखांपर्यंत जाते. Nexon पेट्रोल आणि डिझेल इंजिन या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि त्याचे मायलेज 24.08 kmpl पर्यंत आहे.
मारुती सुझुकीची टॉप सेलिंग सेडानक कार डिझायर मागच्या महिन्यात डिसेंबरमध्ये दुसऱ्या नंबरवर होती. मारुती सुझुकी डिझायर मागच्या महिन्यात 14012 ग्राहकांनी पसंत केले होते. डिसेंबर 2022 च्या तुलनेत डिसेंबर 2023मध्ये डिझायरच्या विक्रीत 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. डिसेंबर 2022 मध्ये 11,997 ग्राहकांनी डिझायर खरेदी केली होती.
टाटा पंच मागच्या महिन्यापासून तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि या कारला 13,784 ग्राहकांनी पसंत केली आहे. टाटा पंचची विक्री डिसेंबर 2022च्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, महिन्याच्या विक्रीत घट झाली आहे. नोव्हेंबर 2023मध्ये 14383 लोकांनी पंच खरेदी केली आहे.