धक्कादायक! 4 वर्षांच्या चिमुकलीला Smartwatch वापरणं पडलं महागात

Smartwatch वापरणं धोकादायक! मुलाच्या हातात असं घड्याळ देण्याआधी ही बातमी नक्की वाचा

Updated: Jul 8, 2021, 11:12 PM IST
धक्कादायक! 4 वर्षांच्या चिमुकलीला Smartwatch वापरणं पडलं महागात title=

मुंबई: भारतात स्मार्टवॉचची मागणी वाढत आहे. लोक सामान्य घड्याळांऐवजी स्मार्टवॉच वापण्याकडे वळत आहेत. अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत या घड्याळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही जर तुमच्या मुलाला हे घड्याळ दिलं असेल किंवा देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 

4 वर्षांच्या चिमुकलीला स्मार्ट वॉच वापरणं चांगलंच महागात पडलं आहे. तिने स्मार्टवॉच घालताच तिच्या मनगटावर त्याचा स्फोट झाला. या स्फोटामुळे तिचा हात संपूर्ण भाजून निघाला. ही धक्कादायक घटना चीनच्या क्वानझो शहरात घडली आहे. 

या चिमुकलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ही चिमुकली आपल्या भावासोबत खेळत होती. त्याचवेळी तिच्या हातावरील घड्याळाचा स्फोट झाला. आजीने या स्फोटाचा आवाज ऐकला. त्यावेळी तिला चिमुकलीच्या ओरडण्याचा आवाज आला. चिमुकलीचा हात भाजला होता. रूममध्ये खूप धूर झाला होता. स्मार्ट वॉचच्या बॅटरीचा स्फोट झाला होता. 

चिमुकलीचा हात पाहताच तिला आजीनं तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. त्याआधी गार पाण्यात या चिमुकलीचा हात बुडवला. डॉक्टरांनी या चिमुकलीवर उपचार सुरू केले. चिमुकलीच्या वडिलांनी ज्या कंपनीचं स्मार्ट वॉच होतं त्यांना संपर्क केला.

वडिलांनी कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे. तुम्ही जर स्मार्टवॉच वापरत असाल तर सावध राहा आणि लहान मुलांच्या हातात तर अशा गोष्टी अजिबात देऊ नका. 

Tags: