१२ मिनिटात फूल चार्ज होणारा स्मार्टफोन

सॅमसंगने अशी एक बॅटरी बनवली आहे जी फक्त 12 मिनिटांत फूल चार्ज होईल.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 3, 2017, 06:16 PM IST
१२ मिनिटात फूल चार्ज होणारा स्मार्टफोन title=

मुंबई : सॅमसंगने अशी एक बॅटरी बनवली आहे जी फक्त 12 मिनिटांत फूल चार्ज होईल.

सॅमसंगनुसार ही बॅटरी चार्जिंग झाल्यानंतर ही बॅटरी बराच काळ टिकेल. विशेष गोष्ट अशी आहे की ही बॅटरी विद्युत वाहनांमध्ये देखील वापरली जाऊ शकते. सॅमसंग इन्स्टीट्यूड ऑफ टेक्नॉलॉजीने एक नवी बॅटरी बनवली आहे. बॅटरीत वापरलं जाणारं ग्रॅफीन बॉल या संस्थेने बनवला आहे.

कंपनीचा दावा आहे की ग्रॅफीन बॉल तंत्रज्ञानावर बनविलेली ही बॅटरी सामान्य लिथियम बॅटरीपेक्षा पाचपट वेगवान आहे. एवढेच नाही तर या बॅटरीची क्षमता 45 टक्क्यांनी वाढू शकते.

सॅमसंगने सांगितले की, बॅटरी ग्रॅफीन बॉलवर बनवलेली ही बॅटरी फक्त 12 मिनिटांत चार्ज होऊ शकते. ही बॅटरी 60 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमानात देखील काम करू शकतेच. जे विद्युत वाहनांसाठीही उपयुक्त आहे.

कंपनी म्हटलं की, ग्रॅफीन कॉपर कंडक्शनच्या तुलनेत 100% चांगली असते. फास्ट चार्जिंगसाठी ही मदत करते. सॅमसंगने मात्र ही बॅटरी कधी बाजारात येईल याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण असं म्हटलं जातंय की, सॅमसंगच्या पुढच्या मोबाईलमध्ये या बॅटरीचा वापर होऊ शकतो.