Smart Technology: घाई घाईत बऱ्यचदा अनेक गोष्टी विसरायला होतात. मात्र, पुरुषांच्या बाबतीत एक अशी गोष्ट आहे जी वसरल्यास त्यांच चौरचौघात हसू होते. लाजेने मान खाली गालावी लागते. या कारण आहे ते पॅंटची चैन. अनेकदा बरेच पुरुष पँटची चैन लावयाला विसरतात यामुळे त्यांचा चांगलीच फजिती होते. मात्र, आता अशी Smart Technology निघालेय की टची चैन उघडी असेल तर लगेच मोबाईलवर अलर्ट येईल.
घाई गगडबडीत पँटची चैन लावयला विसरले असं अनेक जणांसोबत घडते. मग जेव्हा ही बाब लक्षात येते तेव्हा चार चौघांत हसू झालेलं असतं. मात्र, आता अशी वेळच येणार नाही. कारण पँटची चैन उघडी असेल तर लगेच मोबाईलवर याचे नोटीफिकेशन येईल. स्मार्ट पॅंट टेक्नॉलॉजीमुळे हे शक्य होणार आहे.
हल्ली Smart Technology मुळे हातात असलेल्या मोबाईलवर सर्व गोष्टींचे अलर्ट मिळते. अगदी आरोग्याशी संबधीत अलर्ट देखील मोबाईलवर येत असतात. मात्र, आता स्मार्ट पॅंट टेक्नॉलॉजीमुळे पँटची चैन उघडी असेल तर याचा देखील अलर्ट मिळणार आहे. या स्मार्ट पँटच्या चैन जवळ खास सेन्सर असणार आहे. एका App द्वारे पँटचे हे सेन्सर मोबईलशी कनेक्ट केले जाणार आहे. यामुळे पँट घातल्यानंतर जर पँटची चैन उघडी राहिल्या सेन्सरद्वारे मोबाईलवर अलर्ट येईल. जेणेकरुन या अलर्टमुळे तुम्ही लगेच पँटची चैन लावू शकता.
If you know me, you know one of my favorite things to do is speedrun product ideas from my friends. One requested "Pants that detect when your fly is down for too long and send you a notification". Currently seeking investors. pic.twitter.com/Mz3IDnCLaG
— Guy Dupont (@gvy_dvpont) May 23, 2023
ही स्मार्ट पँट ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्टोअरमध्ये मिळाणार नाही. @gvy_dvpont नावाच्या ट्विटर हँडलवरुन ही स्मार्ट पँट टेक्नॉलॉजी काय आहे याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एका व्यक्तीने खास आपल्या मित्रासाठी ही पँट तयार केली. या व्हिडिओमध्ये ही Smart Technology कशी काम करते हे दाखवण्यात आले आहे. एक तरुण पँटची चैन उघडत आणि बंद करत आहे. जेव्हा पँटची चैन उघडी असते तेव्हा मोबाईलवर अलर्ट येतो. या स्मारट पँटमध्ये असलेले सेन्सर हे WiFly नावाच्या App द्वारे मोबईलशी जोडले जातात. ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ 10 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.