मुंबई: आपला मोबाईल सुरक्षित राहावा म्हणून प्रत्येक जण त्याची जास्तच काळजी घेत असतो. त्यासाठी आपण आपल्या मोबाईलला स्क्रीनगार्डदेखील लावत असतो. त्याला कुठेही तडा जाऊ नये स्क्रीन खराब होऊ नये म्हणून आपण मोबाईलवर स्क्रीनगार्ड लावतो. पण हाच आपल्या मोबाईलसाठी धोकादायक ठरू शकतो याचा विचार केला नसेल तर आता नक्की करा.
आपल्या मोबाईलला लावलेला स्क्रीनगार्ड धोकादायक ठरू शकतो. काहीवेळा त्यामुळे फोनमध्ये अडथळेही येतात ज्यामुळे आपल्याला वाटू शकतं की आपला फोन बिघडला आहे. आज आपण हा स्क्रीनगार्ड कसा नुकसानकारक ठरू शकतो याबद्दल जाणून घेऊया.
एका अहवालानुसार, आजकाल फोनमध्ये दिलेली आधुनिक डिस्प्लेच्या खालच्या बाजूला दोन सेन्सर असतात. हे एम्बियंट लाइट सेन्सर आणि Proximity सेन्सर म्हणून ओळखले जातात. हे दोन्ही सेन्सर आपल्याला वरून दिसत नाहीत ते डिस्प्लेमध्ये लपलेले असतात. याचं कारण म्हणजे ते फोन स्क्रीनच्या उजव्या बाजूला वापर करणाऱ्याजवळ आहेत.
फोनच्या स्क्रीनचे संरक्षण करण्यासाठी आपण मोबाईलवर स्क्रीन गार्ड लावतो. तेव्हा स्क्रीनगार्ड हे सेन्सरला ब्लॉक करतात. हे आपल्या स्मार्टफोनमध्ये कॉलसाठीही व्यत्यय आणतात याची आपल्याला कल्पनाही नसते. जेव्हा जेव्हा कोणी आपल्याला कॉल करत असतं तेव्हा बर्याच वेळा तो कॉल कनेक्ट होत नाही असं आपल्याला सांगण्यात येतं. त्याच बरोबर, बर्याच वेळा असंही अनुभवलं असेल की यामुळे फिंगरप्रिंट स्कॅनर फोनमध्ये नीट काम करत नाही.
अशावेळी एखाद्या चांगल्या कंपनीचं ग्लास प्रोटेक्शन वापरणं गरजेचं आहे. याशिवाय जेव्हा तुम्ही मोबाईल खरेदी करायला जाता त्याच वेळी कंपनीकडून देण्यात आलेला किंवा कंपनीने ठरवून दिलेले स्क्रीनगार्ड वापरणं पसंत करा. त्यामुळे ही समस्या कमी होऊ शकते. कंपनी आपल्या मोबाईल मॉडेलला लक्षात घेऊन त्यानुसार स्क्रीनगार्ड तयार करते त्यामुळे ते वापरणं केव्हाही फायद्याचं ठरू शकतं. शक्य असेल तर विना स्क्रीनगार्ड फोन वापरता आला तर सर्वात उत्तम पर्याय आहे.