Amazonच्या चुकीचा ग्राहकांना मोठा फायदा, 96,600 रुपयांची AC विकली फक्त 5,900 रुपयांत

तुम्ही इंटरनेटवर या AC ची किंमत पाहिलीत तर, त्य़ाची मुळ किंमत 96 हजार 600 रुपयांची आहे.

Updated: Jul 5, 2021, 08:43 PM IST
Amazonच्या चुकीचा ग्राहकांना मोठा फायदा, 96,600 रुपयांची AC विकली फक्त 5,900 रुपयांत title=

मुंबई : Amazonने सोमवारी तोशिबा एअर कंडिशनला 94% सुटमध्ये विकले आहे. परंतु Amazonकडून ही मोठी चुक झाली असल्याचे सांगितले जात आहे. कारण जर तुम्ही इंटरनेटवर या AC ची किंमत पाहिलीत तर, त्य़ाची मुळ किंमत 96 हजार 600 रुपयांची आहे. त्यामुळे Amazonने या तोशिबा ACला लिस्ट करताना आपल्या यादीत चुकीचे लिस्ट केले गेलं आहे. परंतु यानंतर या ऑफरचा फायदा घेण्यासाठी काही ग्राहकांनी या AC ला विकत देखील घेतलं आहे. ज्यामुळे त्यांनी 90 हजार रुपयांचा फायदा झाला आहे. या ACसाठी महिन्याला 278 रुपयांचा EMI देखील Amazonकडून देण्यात आला आहे.

Amazonने  आता त्याच तोशिबा 1.8 टन 5-स्टार इन्व्हर्टर एसीची किंमत 59 हजार 490 रुपये केली आहे आणि यावर आता मूळ किंमतीपेक्षा 20 टक्के सवलतीत देण्यात आली आहे. त्याचबरोबर यावर 2800 रुपयांच्या EMI देण्यात आला आहे.

या इनव्हर्टर एसीच्या काही खास वैशिष्ट्यांमध्ये अँटीबैक्टीरियल कोटिंग, एक डस्ट फिल्टर, एक dehumidifier, तोशिबा एसी कॉम्प्रेसर, पीसीबीवरील 1 वर्षाची वॉरंटी, सेन्सर्स, मोटर्स आणि इलेक्ट्रिकल भागांसह अतिरिक्त 9 वर्षाची वॉरंटिचा समावेश करण्यात आला आहे. एसीमध्ये 3.3 सिजनल Energy रेशो आहे आणि 105 x 25 x 32 cm आकारमान असलेली ही AC सफेद रंगात उपलब्ध आहे.

तोशिबाचा हा AC उत्कृष्ट

तोशिबाच्या AC इनव्हर्टरमध्ये असे तंत्रज्ञान वापरते आहे, जे एक ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान आहे. कारण कम्प्रेसरची गती बाहेरच्या वातावरणाप्रमाणे एडजस्ट केले जाते. हानीकारक जीवाणू आणि व्हायरसला संपवण्यासाठी देखील हा AC काम करतो. यामध्ये IAQ फिल्टर आहे, जो कोणत्याही दुर्गंधीत वासाला रोखण्यासाठी फिल्टर कोरडे ठेवण्यासाठी त्याला तो स्वतःच साफ करते, परिणामी तुम्हाला याचा मेंटेनन्स कमी येतो.

याव्यतिरिक्त, तोशिबा ACमध्ये मॅजिक कॉइल, एक एक्वा रेझिन कॉइल आहे. ज्यामुळे धूळीची साठवणूक कमी होते, आणि उर्जा वापरास देखील मदत करते. ज्यामुळे विजेचे बिल कमी येते.

Amazonकडून या आधीही झाली होती अशी चूक

Amazonकडून हे पाहिल्यांदाच झाले नाही. याआधी प्राइम सेल 2019 दरम्यान ई-कॉमर्सच्या या दिग्गज कंपनीने 6 हजार 500 रुपयांत 9 लाख रुपयांचा कॅमेरा गिअर विकला होता. लोकांना या गोष्टींची माहिती मिळताच लोकंनी अ‍ॅमेझॉनकडे धाव घेतली. हे कॅमेरा गिअर सोनी, फुजीफिल्म आणि कॅननसह उच्च प्रतिचे कॅमेरा ब्रँडचे होते.