मुंबई : दिवाळीच्या उंबरठ्यावर कंपन्या नवनव्या ऑफर घेऊन येत आहेत. एकीकडे ई-कॉमर्स कंपन्या धमाकेदार ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत तर दुसरीकडे मोबाईल कंपन्याही कुठे मागे राहिल्या नाहीत. सॅमसंगनेही आपल्या 4 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. सॅमसंगने आपल्या J Series मधल्या चार बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत ही कपात केलीयं.
कंपनीने Galaxy J2 (2018), Galaxy J2 Core, Galaxy J4, आणि Galaxy J6 च्या किंमती कमी केल्या आहेत. पण कपात काही काळासाठीच असणार आहेत. हे फोन 25 ऑक्टोबर पासून 15 नोव्हेंबर पर्यंत स्वस्त दरात विकले जातील असेल रिटेलक महेश टेलीकॉमने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर म्हटलंय.
Galaxy J2 Core ची किंमत 7 हजार रुपये आहे आणि सध्याच्या ऑफरमध्ये फ्लिपकार्टवर 6 हजार 190 रुपयांत उपलब्ध आहे. फेस्टिवल सिझनमध्ये ही किंमत 5 हजार 999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होत आहेत.
Galaxy J2 2018 हा स्मार्टफोन भारतामध्ये 8 हजार 200 रुपयांत असून सर्वसाधारणपणे 7 हजार 690 रुपयांत उपलब्ध होतो. दरम्यान 15 नोव्हेंबर पर्यंत 6 हजार 990 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.
Galaxy J6 च्या 32 जीबी वेरिएंटची खरी किंमत 14 हजार 990 रुपये आहे. 3 जीबी रॅमचा हा फोन 12 हजार 490 रुपयांत उपलब्ध आहे. फेस्टिव सेलमध्ये हा फोन केवळ 11 हजार 490 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.
Galaxy J6 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16 हजार 700 रुपये आहे. या ऑफर अंतर्गत हा स्मार्टफोन 12 हजार 990 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.