मुंबई : सॅमसंग आपले दोन नवे फ्लॅगशिप स्मार्टफोन सॅमसंग गॅलक्सी एस ९ आणि एस ९ प्लस लवकरच लाँच होणार आहे.
मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2018) हे स्मार्टफोन फेब्रुवारी महिन्यात लाँच होणार आहेत. आतापर्यंत कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र या फ्लॅगशिप स्मार्टफोनची चर्चा अगदी जोरात आहे. गॅलक्सी S9 आणि S9+ यांचे रिपोर्ट सतत समोर येत आहेत. असे सांगण्यात येत आहे की, या स्मार्टफोनमध्ये गॅलक्सी एस ८ प्रमाणे इन्फिनिटी डिस्प्ले असून ज्याचे आस्पेक्ट रेशियो १८:९ असणार आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असणार आहे.
रिपोर्ट नुसार, गॅलक्सी एस ९ आणि एस ९ प्लस ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटमध्ये असणार आहे. तसेच एस ९ २५६ जीबी लिमिटेड वेरिएंट देखील असेल. फोनमध्ये अॅड्रॉयड ओरियो ८.० आणि क्वॉलकॉमचे लेटेस्ट स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर असेल. भारतात हा स्मार्टफोन क्वॉलकॉमशिवाय Exynos चिपसोबत लाँच होणार आहे.
या दोन स्मार्टफोनची चर्चा बाजारात असल्यामुळे ग्राहक आतुरतेने वाट पाहत आहेत. सॅमसंग कंपनी कायमच ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना या दोन नव्या स्मार्टफोनसाठी फेब्रुवारी २०१८ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.