Samsung Galaxy S20 FE Price Drop: होळीच्या पार्श्वभूमीवर आता वेगवगेळ्या वेबसाईटवर वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत. तुम्ही एखादा स्मार्टफोन घेण्यासाठी अशाच एखाद्या ऑफर आणि सेलची वाट पाहत असाल तर ही अगदी योग्य वेळ आहे सॅमसंगचा फोन घेण्यासाठी. सॅमसंगचा गॅलेक्सी एस 20 ईएफ (Samsung Galaxy S20 FE) हा प्रिमियम क्लास स्मार्टफोन अगदी स्वस्तात उपलब्ध आहे.
'अॅमेझॉन'वर (Amazon Deal) या फोनवर जवळजवळ 40 हजार रुपयांची सूट देण्यात येत आहे. इतर ऑफर्सचा वापर केल्यास ही सूट अधिक असेल असं सध्या दिसत आहे. म्हणजेच 40 हजारांहून अधिक सूट या फोनवर मिळवता येईल. हा फोन नेमका किती रुपयांना उपलब्ध होईल हे जाणून घेण्याआधी याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत ते पाहूयात...
'सॅमसंग'च्या या फोनमध्ये 6.5 इंचांचा इन्फिनिटी ओ सुपर अल्मोड डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 120 एचझेड रिफ्रेश रेटबरोबर 1080x 2400 (एफएचडी प्लस) रेझोल्युशन देण्यात आलं आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 8 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. इंटरनल स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचं झाल्यास यामध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आळा आहे. ज्यात 12 मेगापिक्सल ओआयएस एफ 1.8 वाइड रेअर कॅमेरा, 8 मेगापिक्सल ओआयएस टॅली कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल वाइड सेन्सरसहीत देण्यात आला आहे. याशिवाय या कॅमेरामध्ये 30 एक्स स्पेस झूम, सिंगल टेक आणि नाइट मोडचे पर्याय आहेत. सुपर फास्ट चार्जिंग, फास्ट वायरलेस चार्जिंग आणि फिंगर प्रिंट सेन्सरची सुविधाही या फोनमध्ये आहे. तसेच 4500 एमएएचची बॅटरी यामध्ये आहे.
सॅमसंगच्या या फोनची मूळ किंमत 74 हजार 999 रुपये इतकी आहे. यावर 60 टक्के सूट देण्यात येत आहे. म्हणजेच या फोनवर 40 हजारांची सूट मिळत आहे. हा फोन केवळ 29 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. इतर ऑफर्स वगैरेचा विचार केला तर यावरही 18 हजारांहून अधिकची अतिरिक्त सूट मिळेल. म्हणजेच हा फोन केवळ 11 हजार 949 रुपयांना मिळू शकतो. त्यामुळे फोन घेण्याचा विचार करत असाल तर हा उत्तम पर्याय ठरु शकतो.