सॅमसंग गॅलेक्सी 'एस' सिरीज लवकरच बाजारात

काय असेल किंमत आणि 'एस' सिरीजची वैशिष्ट्ये

Updated: Feb 10, 2019, 02:39 PM IST
सॅमसंग गॅलेक्सी 'एस' सिरीज लवकरच बाजारात title=

मुंबई - तुम्ही नवीन मोबाईल फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आता  सॅमसंग सिरीजमधील आणखी एक मोबाईल फोन लॉन्च होणार आहे. संमसंगचा Samsung Glaxy S10 हा लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. सॅमसंग 'S'सिरीजअतंर्गत तीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. २० फेब्रुवारी रोजी Galaxy S10, S10+ आणि S10e लॉन्च होणार आहे. या फोनसह वायरलेस इयरफोन आणि गॅलेक्सी वॉच अॅक्टिव्हही लाँच करण्यात येणार आहे. 

भारतीय बाजारात Samsung Glaxy S10 ६ मार्चला लॉन्च केला जाणार असून याची विक्री १५ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. Galaxy S10 ची किंमत ६५ हजार रूपये, Galaxy S10 लाइट ५० हजार रूपये तर Samsung Glaxy S10+ ७५ हजार रूपये इतकी असण्याची शक्यता आहे. 

काय आहेत  Samsung Glaxy S10ची वैशिष्ट्ये

- स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर
- ३००० ते ४००० mAh बॅटरी
- ६.११ ते ६.४४ इंच डिस्प्ले
- पंचहोल कॅमेरा
- तिनही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.