सॅमसंग 'गॅलॅक्सी नोट ८' लाँच होण्याआधी लीक झाली किंमत

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सॅमसंग गॅलॅक्सी नोट ८ च्या लाँचसाठी फक्त एक दिवस बाकी आहे. हा स्मार्टफोन २३ ऑगस्टला न्यूयॉर्क शहरात लाँच केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच या स्मार्टफोनची किंमत लीक झालीये. 

Updated: Aug 22, 2017, 05:27 PM IST
सॅमसंग 'गॅलॅक्सी नोट ८' लाँच होण्याआधी लीक झाली किंमत title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सॅमसंग गॅलॅक्सी नोट ८ च्या लाँचसाठी फक्त एक दिवस बाकी आहे. हा स्मार्टफोन २३ ऑगस्टला न्यूयॉर्क शहरात लाँच केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच या स्मार्टफोनची किंमत लीक झालीये. 

डिजीटल न्यूज आऊटलेट ITHomeच्या माहितीनुसार, गॅलॅक्सी नोट ८ हा स्मार्टफोन एक अथवा दोन नव्हे तर तीन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे. यात ६ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत ६०,५०० रुपये, ६ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज स्मार्टफोनची किंमत ६८,२०० रुपये आणि ६ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज स्मार्टफोनची किंमत ७६,९०० रुपये आहे. 

ऑस्ट्रेलिया, युरोप तसेच दक्षिण अमेरिकेतील अनेक मार्केटमध्ये या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये.