स्मार्टफोन घ्यायचाय पण बजेट कमी आहे; Samsung हा 12 हजारांचा फोन मिळतोय 7,000

Samsung Galaxy M04: फोन घ्यायचा विचार कराताय. तर ही बातमी तुमच्यासाठी कारण सॅमसंगच्या या फोनवर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळतंय. जाणून घ्या 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 28, 2023, 04:42 PM IST
स्मार्टफोन घ्यायचाय पण बजेट कमी आहे;  Samsung हा 12 हजारांचा फोन मिळतोय 7,000 title=
samsung galaxy m04 buy with bumper discount offer from amazon

Samsung Galaxy M04: Samsung Smartphone हे नेहमीच चर्चेत असतात. तुम्हीदेखील इतक्यात एखादा फोन घेण्याच्या विचारात असाल आण तुमचे बजेटही कमी आहे तर तुम्ही सॅमसंगच्या या स्मार्टफोनचा विचार करु शकता.  Samsung Galaxy M04 हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. तुम्हाला या फोनवर चांगले डिस्काउंट मिळत आहे. त्याचबरोबर फोनचे डिझाइन आणि फिचर्सही उत्तम आहे. तर जाणून घेऊया या फोनवर असलेल्या ऑफर्स आणि फिचर्सबद्दल. (Samsung Galaxy M04 Price)

Samsung Galaxy M04 (4GB+64GB) हा स्मार्टफोन तुम्ही अॅमेझॉनवरुनही ऑर्डर करु शकता. या फोनची किंमत 11,999 रुपये असून यामध्ये तुम्हाला 43 टक्के डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंट मिळाल्यानंतर 6,799 रुपयांत ऑर्डर करु शकता. त्याचबरोबर तुम्हाला या फोनवर अन्य ऑफर्सही मिळत आहेत. जुन्या स्मार्टफोनवर अॅमेझॉनवर एक्सचेंज ऑफरदेखील मिळत आहेत. एक्सचेंज ऑफरनंतर हा फोन तुम्हाला 6,450 रुपयांचे डिस्काउंटदेखील मिळत आहेत. मात्र, हे डिस्काउंट मिळवण्यासाठी तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असायला हवा. 

डिस्काउंट किती मिळणार

सॅमसंगच्या या फोनवर तुम्हाला अनेक बँकेच्या ऑफर्सदेखील मिळत आहेत. क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यानंतर 750 रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. त्याचबरोबर 1 वर्षांची वॉरंटीदेखील फोनसोबत देण्यात येत आहे. स्पेसिफिकेशनसाठीही हा फोन बेस्ट आहे. कारण यात MediaTek Helio P35 Octa Core हा प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामुळं फोनचा स्पीड खूप चांगला आहे. 

फोनची बॅटरी क्षमता 

डुअल रियर कॅमेरा सेटअप या फोनमध्ये देण्यात आलेला आहे. तर. प्रायमरी कॅमेरा 13 MP असून 5 MP फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन तुमच्या बजेटमधला आहे. यात 6.5 इंचाचा  LCD HD+ Display देण्यात आला आहे. 5000 mAh Battery असल्यामुळं चार्जिंगचे टेन्शनदेखील नाही. त्यामुळं एका चार्जमध्येही फोनची बॅटरी कित्येक तास टिकू शकते.