नवी दिल्ली : रेनॉ या कंपनीला भारतात त्यांची बेस्ट सेलिंग कार ‘क्विड’ला रिकॉल करावं लागलं आहे. आता किती कार्समध्ये तांत्रिक बिघाड आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये.
०.८ लिटर आणि १.० लिटर इंजिनमध्ये उपलब्ध असलेली ही कार स्टीअरिंग सिस्टममध्ये असलेल्या बिघाडामुळे परत मागवण्यात आली आहे.
कंपनीकडून क्विड कार घेणा-या ग्राहकांना ऑफिशिअल पत्र पाठवलं आहे. या त्यांनी ग्राहकांना जवळच्या रेनॉ डिलरशी संपर्क करण्याचा आग्रह केला आहे. डिलर्सकडून रेनॉ क्विड कार्चच्या स्टीअरिंग सिस्टीमची चाचणी घेतली जाणार आहे. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाहीये.
या कार याआधी एकदा परत मागवण्यात आल्या होत्या. याआधी ५० हजार क्विड कार्स रॅनोने परत मागवल्या होत्या. त्या कार्सव्या फ्युअल डिलिवरी सिस्टीममध्ये बिघाड होता.
कार्स रिकॉल करणे ग्लोबल मार्केटमध्ये साधारण बाब आहे. आता हा ट्रेन्ड भारतीय बाजारातही वेगाने वाढत आहे. कंपनी ग्राहकांच्या हितासाठी कार्स परत मागवतात. क्विड रॅनोची आत्तापर्यंत सर्वात जास्त विकली गेलेली कार आहे.