रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये दिवसाला मिळणार ५ जीबी डेटा

रिलायन्सने जेव्हापासून जिओची सर्व्हिस सुरु केलीये तेव्हापासून टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटावॉर सुरु झालंय. प्रत्येक कंपनीमध्ये स्वस्त आणि मस्त डेटा प्लान देण्याची जणू स्पर्धाच सुरु झालीये.

Updated: Jan 10, 2018, 01:26 PM IST
रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये दिवसाला मिळणार ५ जीबी डेटा title=

मुंबई : रिलायन्सने जेव्हापासून जिओची सर्व्हिस सुरु केलीये तेव्हापासून टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटावॉर सुरु झालंय. प्रत्येक कंपनीमध्ये स्वस्त आणि मस्त डेटा प्लान देण्याची जणू स्पर्धाच सुरु झालीये.

नुकतीच जिओने हॅपी न्यू ईयर २०१८ प्लानच्या किंमतीत कपात केली होती. आताही अशी बातमी आलीये की जिओच्या १ जीबी प्रतिदिवसाच्या प्लानमध्ये ५० रुपयांपर्यंत कपात करण्यात आलीये.

कंपनीने आता दोन प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत कपात करण्यासोबतच ५०९ आणि ७९९ रुपयांचे प्लान्स अपडेट केलेत. 

५०९ रुपयांचा प्लान

याआधी ५०९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनीकडून दिवसाला २ जीबी डेटा, अनलिमेटेड कॉलिंग  ४९ दिवसांसाठी दिले जात होते. या प्लानमधील डेटाची मर्यादा वाढून ३ जीबी करण्यात आलीये. मात्र त्याची व्हॅलिडिटी २८ दिवस करण्यात आलीये.

७९९ रुपयांचा प्लान

७९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ५ जीबी डेटा दिला जाणार आहे. याआधी या प्लानमध्ये ३.५ जीबी डेटा दिला जात होता. याशिवाय जिओच्या १४९, ३४९, ३९९ आणि ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये अनुक्रमे २८ जीबी, ७० जीबी, ८४ जीबी आणि ९१ जीबी अनुक्रमे २८ दिवस, ७० दिवस, ८४ दिवस आणि ९१ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळणार आहे.