जिओची खुशखबर, त्या ऑफरला मुदतवाढ

रिलायन्स जिओनं त्यांच्या 4G वायफाय डिव्हाईस जिओफायला मुदतवाढ दिली आहे.

Updated: Oct 3, 2017, 05:02 PM IST
जिओची खुशखबर, त्या ऑफरला मुदतवाढ title=

मुंबई : रिलायन्स जिओनं त्यांच्या 4G वायफाय डिव्हाईस जिओफायला मुदतवाढ दिली आहे. सणानिमित्त या ऑफरला मुदतवाढ देत असल्याची माहिती जिओनं ट्विटरवर शेअर केली आहे. ९९९ रुपयांमध्ये जिओचं हे वायफाय मिळणार आहे.

सुरुवातीला जिओ वायफायसाठी लागणारं डिव्हाईस १९९९ रुपयांना होतं, पण खास ऑफर म्हणून २० सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये हे डिव्हाईस ९९९ रुपयांना मिळत होतं. ३० सप्टेंबरला संपणाऱ्या या ऑफरला जिओनं मुदतवाढ दिली आहे.

जिओचं हे डिव्हाईस घेतल्यानंतर ग्राहकांना अनलिमिटेड 4G इंटरनेट डेटा, एचडी व्हॉईस कॉल, एसएमएस आणि जिओ प्रिमिअम अॅप मिळणार आहे. ३१ डिसेंबर २०१७पर्यंत याचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.