रिलायन्स जिओनं वाढवली ही ऑफर!

रिलायन्स जिओने आपल्या गेट मोर देन १००% कॅशबॅक ऑफरची अंतिम तारीख वाढवली आहे.

Updated: Mar 17, 2018, 09:10 AM IST
रिलायन्स जिओनं वाढवली ही ऑफर! title=

मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या गेट मोर देन १००% कॅशबॅक ऑफरची अंतिम तारीख वाढवली आहे. १५ मार्चला या ऑफची शेवटची तारिख होती. ती वाढवून आता ३१ मार्च करण्यात आली आहे. जर अजूनही तुम्ही या ऑफरचा लाभ घेतला नसेल तर तुमच्याकडे १५ दिवसांचा वेळ आहे.

जियोच्या  १००% कॅशबॅक ऑफरअंतर्गत प्राईम युजर्सला ३९८ रुपये किंवा त्याच्याहुन अधिक किंमतीचा रिचार्ज करावा लागेल. त्यावर तुम्हाला ४०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. या ऑफरचा लाभ कसा घ्याल पहा...

  • ४०० रुपये तुम्हाला ८ कूपनच्या स्वरुपात मिळतील. १ कूपन ५० रुपयांचे असेल. एका वेळेस एकच कूपन वापरता येईल. म्हणजे एका रिचार्जवर ५० रुपयांची सुट मिळेल. 
  • जर तुम्ही पेटीएमने रिचार्ज करत असाल आणि नवीन युजर असाल तर तुम्हाला ५० रुपये कॅशबॅक मिळेल. तर आधीपासूनच्या युजर्संना ३० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. यासाठी नव्या युजर्संना NEWJIO प्रोमो कोड आणि आधीपासूनच्या युजर्संना PAYTMJIO प्रोमो कोड वापरावा लागेल.
  • भीम अॅपमधून रिचार्ज करत असाल तर नवीन युजर्संना १०० रुपयांचे तर जुन्या युजर्संना ३० रुपयांचे कॅशबॅक मिळेल.
  • मोबिक्विकवरुन रिचार्ज केल्यास दोन्ही युजर्संना ३०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. तर अॅमेझॉन पे वरुन रिचार्ज केल्यास दोन्ही युजर्संना ५० रुपयांचे कॅशबॅक मिळेल.