श्योमीच्या Redmi Y1, Redmi Y1 Liteची बंपर विक्री

मोबाईल निर्माता कंपनी श्योमी पुन्हा एकदा बंपर विक्रीसाठी चर्चेत आलीये.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 9, 2017, 04:20 PM IST
श्योमीच्या Redmi Y1, Redmi Y1 Liteची बंपर विक्री title=

मुंबई : मोबाईल निर्माता कंपनी श्योमी पुन्हा एकदा बंपर विक्रीसाठी चर्चेत आलीये.

श्योमीने नुकतेच Redmi Y1 आणि Redmi Y1 Lite हे स्मार्टफोन भारतात लाँच केले. बुधवारी या स्मार्टफोनची विक्री सुरु झाली आणि अवघ्या तीन मिनिटांत ऑऊट ऑफ स्टॉक झाले.

अॅमेझॉनवर स्मार्टफोनची विक्री

हे दोनही स्मार्टफोन अॅमेझॉनवर विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. विक्रीसाठी उपलब्ध केल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत हे स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक झाला. 

पहिल्या सेलमध्ये दीड लाख स्मार्टफोनची विक्री

श्योमी इंडियाचे डायरेक्टर मनु कुमार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. कंपनीच्या पहिल्या सेलमध्ये तब्बल दीड लाख स्मार्टफोनची विक्री झाला. हे दोन्ही स्मार्टफोन विक्रीसाठी पुन्हा १५ नोव्हेंबरला उपलब्ध केले जाणार आहेत. 

स्मार्टफोनची किंमत 

Redmi Y1च्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी असलेल्या स्मार्टफोनची किंमत ८,९९९ रुपये आणि ४ जीबी रॅम+६४ जीबी मेमरी असलेल्या स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपये ठेवण्यात आलीये. Redmi Y1 Lite या स्मार्टफोनची किंमत ६,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. 

फीचर्स

Redmi Y1 - ५.५ इंचाचा डिस्प्ले
गोरिला ग्लास प्रोटेक्शन
ओक्टाकोर क्वालमकॉम स्नॅपड्रॅगन ४३५ 
३ आणि ४ जीबी रॅम
३२ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध
१६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
फिंगरप्रिंट सेन्सर
३०८० एमएएच बॅटरी

Redmi Y1 Lite - ५.५ इंचाचा डिस्प्ले
गोरिला ग्लास प्रोटेक्शन
२ जीबी रॅम
१६ जीबी मेमरी
५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा