बाजारात लॉन्च झाले रेडमीचे दोन नवे फोन...

चीनी मोबाईल कंपनी शाओमीने बुधवारी रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो लॉन्च केले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 14, 2018, 11:12 PM IST
बाजारात लॉन्च झाले रेडमीचे दोन नवे फोन... title=

नवी दिल्ली : चीनी मोबाईल कंपनी शाओमीने बुधवारी रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो लॉन्च केले. दोन्हीही फोन कंपनीने दोन दोन वेरिंएटमध्ये लॉन्च केले. त्याचबरोबर कंपनीने भारतात टी.व्ही. 4 सिरीजचे टेलिव्हिजनही लॉन्च केले.

काय आहेत फिचर्स?

रेडमी नोट 5 मध्ये 5.99 इंच आणि 1080x2160 पिक्सल रिजोल्युशनचा डिस्पले आहे. हा फोन अॅनरॉईड नूगाच्या बेस्ड एमआययूआय 9 वर चालतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रेगन 625  प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये 12 MP चा रिअर कॅमेरा आणि 5 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

नोट 5 ला 32 GB आणि 64 GB स्टोरेज वेरिएंटसहित लॉन्च करण्यात आले आहे. मात्र दोन्हीही वेरिएंटमध्ये हायब्रिड सिम स्लॉट देण्यात आले आहे. 3 GB रॅमच्या वेरिंएटमध्ये 32 GB इंटरनल स्टोरेज आहे. फोनच्या 4 GB रॅम असलेल्या वेरिंएटमध्ये 64 GB इंटरनल स्टोरेज आहे.

रेडमी नोट 5 मध्ये 4000 mAh ची बॅटरी आहे. जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात प्रिमियम मेटल बॉडी दिली आहे. तर रेडमी नोट 4 अत्यंत पातळ आहे. या फोनच्या कॅमेऱ्यातून कमी प्रकाशातही चांगला फोटो येईल, असे कंपनीने सांगितले आहे.
रेडमी नोट 5 प्रो मध्ये 5.99 इंच आणि 1080x2160 पिक्सल रिजोल्युशनचा डिस्पले आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रेगन 636 प्रोसेसरचा जगातील हा पहिला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये लेटेस्ट क्रायो 260 सीपीयू दिलेला आहे.