Redmi Note 12 Series: फक्त 10 मिनिटात होणार फूल चार्ज आणि डिझाईन पाहून व्हाल खूश

अलीकडील अहवालानुसार, नोट 12 लाइनअपमध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर + 2-मेगापिक्सेल मॅक्रो/डेप्थ युनिट यांचा समावेश असेल.

Updated: Sep 30, 2022, 01:36 PM IST
Redmi Note 12 Series: फक्त 10 मिनिटात होणार फूल चार्ज आणि डिझाईन पाहून व्हाल खूश title=

Redmi Note 12 Series: रेडमी लवकरच Note 12 सीरिज आणण्याच्या तयारीत आहे. या सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन असू शकतात. Redmi Note 12 Pro+, Redmi Note 12 Pro, आणि Redmi Note 12 यांचा समावेश असू शकतो. सोशल मीडिया लीक आणि चर्चांमधून आगामी हँडसेटबद्दल बरेच तपशील समोर आले आहेत. लाँचच्या काही महिन्यांपूर्वी, 3C सर्टिफिकेशन साइटवर तीन कथित नोट 12 सीरिज स्मार्टफोन दिसले आहेत. 22101316UC, 22101316UCP आणि 22101316C असे मॉडेल नंबर असून ते Redmi Note 12 Pro+, Redmi Note 12 Pro आणि वेनिला Redmi Note 12 यांचे असल्याचं बोललं जात आहे.

Redmi Note 12 Pro+ 210W जलद चार्जिंगसह येऊ शकतो. तर नोट 12 प्रो 120W जलद चार्जिंगला सपोर्ट करेल. व्हॅनिला नोट 12 मॉडेलमध्ये 67W जलद चार्जिंग असू शकते. अलीकडे, 210W Xiaomi चार्जर देखील 3C प्रमाणन साइटवर सूचीबद्ध केले गेले होते, जे Note 12 Pro+ सह पदार्पण करू शकते. सध्या, iQOO 10 Pro सोबत जलद चार्जिंग सपोर्टसह येतो. हँडसेट 200W फास्ट चार्जिंगद्वारे केवळ स्क्रिन बंद असताना 10 मिनिटांत स्मार्टफोनला पूर्णपणे चार्ज करू शकते.

GPay करताना आताही मिळवू शकता Cashback! पेमेंट करताना या ट्रिक वापरून पाहा

अलीकडील अहवालानुसार, नोट 12 लाइनअपमध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर + 2-मेगापिक्सेल मॅक्रो/डेप्थ युनिट यांचा समावेश असेल. Note 12 Pro आणि Note 12 Pro + डायमेंशन 1300 चिपसेटसह सुसज्ज असण्याची अपेक्षा आहे. Redmi Note 12 मालिका पुढील काही आठवड्यांत चीनमध्ये लाँच होईल. त्यानंतर पुढील काही महिन्यांत जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असेल.