Redmi Note 12 Launched in India : Xiaomi ने भारतात Redmi Note 12 ने सीरीज लॉंच केली आहे. या Redmi Note 12 अंतर्गत तीन फोन लॉन्च करण्यात आले आहेत. ज्यामध्ये Redmi Note 12, Redmi Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ भारतात लॉन्च केले आहेत. यामध्ये Redmi Note 12 ची सुरूवातीची किंमत 17,999 आहे. Redmi Note 12 Pro+ ची सुरूवातीची किंमत 29,999 आणि Redmi Note 12 pro ची सुरूवातीची किंमत 26,999 रुपये आहे. हे तिन्ही फोन 5G सपोर्ट देण्यात आला आहे.
Redmi Note 11 Pro+ स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा सेन्सरसह इन-बॉक्स 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट करण्यात आले आहे. तसेच या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. Redmi Note 11 Pro मध्ये 108MP कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तर 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. याशिवाय 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जात आहे. Redmi Note 12 स्मार्टफोन 50MP मुख्य कॅमेरा सेन्सरसह येईल.
रेडमी नोट लाइनअप आधीच चीनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. Redmi Note 12 स्मार्टफोनमध्ये 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याला 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 33W फास्ट चार्जिंग दिले जात आहे. Redmi Note 12 Pro स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 1080 प्रोसेसर देण्यात आला आहे.
वाचा : ऋषभ पंत वनडे वर्ल्डकपमधून बाहेर? 'ही' धक्कादायक माहिती समोर
Redmi Note 12 5G ची किंमत आणि ऑफर
तसेच ICICI बँक कार्डवरून फोन खरेदी केल्यास 1500 रुपयांची सूट दिली जात आहे. फोनचा पहिला सेल 11 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा फोन mi.com, Mi Home स्टोअर्स, Amazon वेबसाइटवरून खरेदी करू शकतात.
Redmi Note 12 Pro 5G
जर हा फोन घेत असाल तर ICICI बँक कार्डवरून फोन खरेदी केल्यास 3,000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. फोनची विक्री 11 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.
Redmi Note 12 Pro+ 5G
या फोनची विक्री 11 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.