50 MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी अन् किंमत फक्त...; POCO ने लाँच केला स्वस्त मोबाईल, पहिल्या सेलमध्ये डिस्काऊंट

POCO ने बजेट सेगमेंटमध्ये आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन परडवणाऱ्या किंमतीत उपलब्ध आहे. जाणून या मोबाईलचे फिचर्स काय आहेत.   

शिवराज यादव | Updated: Dec 15, 2023, 04:59 PM IST
50 MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी अन् किंमत फक्त...; POCO ने लाँच केला स्वस्त मोबाईल, पहिल्या सेलमध्ये डिस्काऊंट title=

POCO ने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्टफोन POCO C65 ला लाँच केलं आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे, जो बऱ्याच अंशी नुकताच लाँच केलेल्या Redmi 13C चं रिब्रँडेड व्हर्जन आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 

हा स्मार्टफोन हैंडसेट MediaTek Helio G85 प्रोसेसरसह येतो. कंपनीचं म्हणणं आहे की, हा डिव्हाइस दोन अँड्रॉईड अपडेट आणि तीन वर्षाच्या सेक्युरिटी अपडेटसह येतो. या स्मार्टफनची किंमत आणि इतर माहिती जाणून घ्या. 

POCO C65 ची किंमत

पोकोचा हा फोन तीन कॉन्फिग्रेशनमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 8,499 रुपये आहे. तर 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंटसाठी 9,499 रुपये मोजावे लागतील. टॉप व्हेरियंट 8GB RAM + 256GB स्टोरेजसह येतो. याची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. 

हा फोन तुम्हाला मॅट ब्लॅक आणि पॅस्टर ब्ल्यू रंगात खरेदी करु शकता. POCO C65 स्मार्टफोन विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे. ICICI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारावर 1000 रुपयांचा डिस्काऊंट दिला जाणार आहे. 

काय आहेत फिचर्स?

हा स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्टसह उपलब्ध आहे. POCO C65 स्मार्टफोन Android 13 वर आधारित MIUI 14 वर काम करतो. यामध्ये 6.74 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा हँडसेट MediaTek Helio G85 प्रोसेसरवर काम करतो. 

यामध्ये 8GB RAM आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. स्टोरेज तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. हा स्मार्टफोन ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्याचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. फ्रंटला कंपनीने 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. 

POCO C65 मध्ये  5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 18W ची चार्जिंग आणि USB टाइप-सी पोर्ट मिळतो. सुरक्षेसाठी कंपनीने साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिलं आहे.