Poco C40 ची बाजारात एन्ट्री, किंमत आणि फिचर्स आले समोर

जगभरात अनेक स्मार्टफोन लॉंच होत असतात, आता असाच एक स्मार्टफोन लॉंच झाला आहे.

Updated: Jun 6, 2022, 08:34 PM IST
 Poco C40 ची बाजारात एन्ट्री, किंमत आणि फिचर्स आले समोर  title=

मुंबई  : जगभरात अनेक स्मार्टफोन लॉंच होत असतात, आता असाच एक स्मार्टफोन लॉंच झाला आहे. Poco C40 असे या स्मार्टफोनचे नाव असून भारतात लॉंच होण्यापूर्वीच त्याची किंमत आणि फिचर्सची माहिती समोर आली आहे. हा नवीन स्मार्टफोनची फिचर्स जाणून घेऊयात. 

Poco C40 16 जून रोजी जागतिक स्तरावर लॉंच करण्यात येणार आहे. पण, या स्मार्टफोनची एंट्री आधीच बाजारात झाली आहे. Poco C40 हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे जो व्हिएतनाममध्ये लॉंच झाला आहे.

फिचर्स 
Poco C40 मध्ये 6.71-इंचाची LCD स्क्रीन आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1560 x 720 पिक्सेल (HD +) आहे. हे 60Hz रिफ्रेश सपोर्टसह येते. त्याला 400 nits पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. या पॅनलमध्ये ड्यूड्रॉप नॉच देण्यात आला आहे.  या फोनला गोरिल्ला ग्लासही असणार आहे.  

प्रोसेसरबद्दल सांगायचं झालं तर Poco C40 मध्ये JLQ JR10 प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने पहिल्यांदाच हा प्रोसेसर वापरला आहे. सॉफ्टवेअर फ्रंटवर, हा फोन Android 11 मध्ये देण्यात आला आहे. परंतु, सध्या MIUI आवृत्तीबद्दल माहिती उपलब्ध नाही. 

या फोनच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर,  Poco C40 च्या मागील बाजूस डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 13-मेगापिक्सेल आहे. यात 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. फोनच्या पुढील बाजूस सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात USB Type-C पोर्ट आहे. यात 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे. पण, बॉक्समध्ये 10W चा चार्जर देण्यात आला आहे.

किंमत काय ? 
Poco C40 काळ्या, पिवळ्या आणि हिरव्या रंगामध्ये वापरकर्त्यांना खरेदी करता येणार आहे. व्हिएतनाममध्ये, हे सिंगल 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहे. या फोनची किंमत  VND 3,490,000 (सुमारे 11,500 रुपये) ठेवण्यात आली आहे.