Back Cover Harmful For Smartphone: बॅक कव्हरच स्मार्टफोनसाठी ठरु शकतो धोकादायक; जाणून घ्या पाच महत्त्वाचे मुद्दे

Phone Cover Disadvantages: अनेकजण स्मार्टफोनला आवर्जून कव्हर घालतात. मात्र अशाप्रकारे मोबाईलला बॅक कव्हर घालणं हे फारच धोकादायक ठरु शकतं हे अनेकांना ठाऊक नसतं, याच धोक्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Updated: Jan 21, 2023, 01:14 PM IST
Back Cover Harmful For Smartphone: बॅक कव्हरच स्मार्टफोनसाठी ठरु शकतो धोकादायक; जाणून घ्या पाच महत्त्वाचे मुद्दे title=
Mobile Cover Disadvantages

Back Cover Harmful For Smartphone: फोनला बॅक कव्हर (Mobile Back Cover) घालणं हा फोन सुरक्षित ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग समजला जातो. अनेकदा हातातून फोन सटकतो किंवा पडतो त्यावेळेस हे बॅक कव्हरच फोनला अधिक नुकसान होऊ नये याची काळजी घेतलं. अनेकजण याच कारणामुळे फोनला कव्हर घालतात. खरं तर सध्या फोनच्या किंमती (Mobile Prices) एवढ्या महाग झाल्या आहेत की छोटंसं नुकसान झालं तरी हजारो रुपयांचा फटका बसू शकतो. अनेकजण तर प्रिमियम स्मार्टफोन वापरण्याला प्राधान्य देत असल्याने काही शे रुपयांचं कव्हर जर फोन सुरक्षित ठेवणास असल्यास ते का वापरुन नये असा विचार करुनही फोनला आवर्जून कव्हर घालतात. तुम्हीही त्यांच्यापैकी एक असणार किंवा कधी ना कधी फोनला कव्हर वापरला असणार. मात्र या कव्हरचा ज्याप्रमाणे फायदा होतो तसाच त्याचा फार तोटाही आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

अर्थात हा प्रश्नच तुम्हाला वाचायला थोडा अवघडल्यासारखा किंवा विचित्र वाटला असेल. म्हणजे फोन कव्हर (Phone Back Cover) लावल्याचा काय तोटा असू शकतो. एवढा वेळा या कव्हरमुळे फोन वाचलाय वगैरे वगैरे तुमचा युक्तीवाद असू शकतो. मात्र खरोखरच हा बराच उपयोगा वाटणारा कव्हर फोनसाठी घातकही ठरु शकतो. कशापद्धतीने फोनसाठी हे कव्हर घातक ठरु शकतात जाणून घेऊयात...

> फोन बॅटरीवर काम करतात. त्यामुळे अनेकदा फोन मागून गरम झाल्याचं तुम्ही पाहिलं आसेल. मोबाईलचे कव्हर हे हार्ट प्लॅस्टिकचे किंवा रबरचे असतात. त्यामुळे फोनमध्ये तयार झालेली उष्णता बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. अशाप्रकारे बॅटरीच्या माध्यमातून तयार झालेली उष्णता फोनमध्ये साठून राहिल्याने स्मार्टफोन स्लो होतात. 

> फोनला कव्हर असेल आणि तो चार्जिंगला लावला तर त्याची चार्जिंग स्पीड कमी होते. फोन जेव्हा चार्ज होतो तेव्हा तो तापतो. सामान्यपणे बॅटरी तापते आणि त्यामधून उष्णता बाहेर पडते. म्हणूनच अनेकदा चार्जिंगला लावलेला फोन तापल्याचं तुम्हालाही जाणवलं असेल. अशाप्रकारे फोन चार्ज करताना कव्हर लावून ठेवल्यास बॅटरीमधील ऊर्जा बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो आणि त्याचा परिमाण बॅटरीवर होतो. उष्णतेमुळे बॅटरीची चार्जिंगची क्षमता कमी होते आणि फोन स्लो चार्ज होतो. 

> बॅटरी चार्ज होताना ती गरम होत असल्याने त्याची चार्जिंग ऑटोमॅटिकली कमी स्पीडने होते. असं झालं नाही तर उष्णतेमुळे बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता असते. 

> फोनला कनेक्टिव्हिटी नसेल तर तो फारसा उपयोगाचा राहत नाही. फोनमध्ये अनेक सेन्सर्स असतात. जेव्हा फोनवर कव्हर लावला जातो तेव्हा सेन्सर झाकले जातात. त्यामुळे फोन मंद गतीने रिस्पॉन्स करतो. फोनचा रिअॅक्शन टाइम वाढण्यामागे सेन्सर झाकलेले असणे हे महत्त्वाचं कारण असतं. यामुळे कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण होते.

> तसेच फोनवर एकदा कव्हर लावल्यानंतर अनेक महिने तो कव्हर काढून साफ केला जात नाही. अशावेळी त्या कव्हरमध्ये धूळ साठते. या धुळीमुळे फोनला फिजिकल डॅमेज होतं. अनेकदा साचलेली धूळ आणि कव्हरमधील कचऱ्यामुळे मोबाईलच्या तळाशी किंवा वर असलेले सेन्सर्स तसेच पोर्टही ब्लॉक होतात.