मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक अस्वस्थ झाले आहेत, त्यातच गॅस सिलेंडरचेही भाव वाढले आहेत. जे सध्याच्या परिस्थितीत लोकांना परवडणारे नाहीत. अशातच Paytm LPG ने ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आणली आहे. पेटीएम यूझर्यना एलपीजी सिलिंडरवर 50 किंवा 75 रुपये नव्हे तर चक्कं 800 रुपयांपर्यंत सूट मिळण्याची संधी आहे. या पेटीएम ऑफरअंतर्गत ग्राहकांना केवळ 9 रुपयांमध्ये 809 रुपयांचा सिलेंडर मिळू शकतो.
पेटीएमने अलीकडेच ही कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे, ज्यामध्ये गॅस सिलिंडर बुक केल्यावर ग्राहकांना 800 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. तुम्ही 31 मे 2021 पर्यंत या पेटीएम ऑफरचा लाभ घेऊ शकता.
पेटीएमकडून प्रथमच एलपीजी सिलेंडर बुक करणारे ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या ऑफर अंतर्गत, ग्राहकांना एक स्क्रॅच कार्ड दिले जाईल ज्याची कॅशबॅक प्राईझ 800 रुपये असेल. पहिल्या एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगवर ही ऑफर आपोआप लागू होईल. या ऑफरचा लाभ किमान 500 रुपयांच्या पेमेंटवर उपलब्ध असेल.
कॅशबॅकसाठी ग्राहकांना स्क्रॅच कार्ड खोडावे लागेल, आणि त्यामधली रक्कम तुम्हाला बिल भरल्यानंतर मिळेल. ही कॅशबॅक रक्कम 10 ते 800 रुपयांपर्यंत असू शकते. आपल्याला हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत उघडावे लागेल. त्यानंतर आपण ते वापरण्यास सक्षम राहणार नाही.
तुम्हाला या ऑफरचा फायदा घेण्याची इच्छित असेल तर, पेटीएम अॅप डाउनलोड करा. यानंतर, आपल्या गॅस एजन्सीकडे सिलेंडर बुक करावे लागेल. यासाठी पेटीएम अॅपमधील शो मोअर वर जा आणि बिल भरण्यासाठी रिचार्जवर क्लिक करा.
यानंतर आपल्याला सिलेंडर बुक करण्याचा पर्याय मिळेल आणि त्यानंतर आपला गॅस एजन्सी कंपनी निवडा. बुकिंग करण्यापूर्वी, तुम्हाला FIRSTLPG हा प्रोमो कोड टाकावा लागेल. यानंतर, 24 तासात आपल्याला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल, जे 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.
सध्या या सिलिंडरची किंमत आहे
सध्या दिल्लीत ग्राहकांना 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलेंडरसाठी 809 रुपये द्यावे लागत आहे. तर कोलकाता येथे त्याची किंमत 835.50 रुपये आहे, मुंबईत त्याची किंमत 809 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये 825 रुपये आहे.