Online Shopping : ऑनलाइन शॉपिंग कराताय? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

Shopping Tips : जर तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग स्वस्तात करू शकता.

Updated: Oct 28, 2022, 05:20 PM IST
Online Shopping : ऑनलाइन शॉपिंग कराताय? मग फॉलो करा ‘या’ टिप्स title=

Online Shopping Tips : दसरा-दिवाळीसारख्या सणांसाठी ऑनलाइन खरेदी करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. कपडे, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स सामान, मोटार, दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने, चपला-बूट, सजावटीच्या सामानापासून ते थेट मिठाईपर्यंत ऑनलाइन खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. मात्र, ऑनलाइन खरेदीदरम्यान काही फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे सणांसाठी ऑनलाइन खरेदी करताना नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.     

अशावेळी स्वस्तात मस्त शॉपिंग (Shopping) करायची हौस कोणाला नसते? लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती शॉपिंग करतात. सध्या डिजिटल (Digital) युगामुळे ही पद्धत बदलली आहे. अनेकजण आता ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) करतात.

परंतु, ऑनलाइन शॉपिंग करत असताना काही वस्तू खूप महाग असतात. जर तुम्ही काही टिप्स (Shopping Tips) फॉलो केल्या तर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग स्वस्तात करू शकता.

अनेकदा ई-कॉमर्स (e-commerce) वेबसाइटवर अनेक बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर (Debit card) विशेष ऑफर असतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्या बँकांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Credit card) वापरून किंमतीपेक्षा कमी किमतीत वस्तू खरेदी करू शकता.

याशिवाय ई-कॉमर्स वेबसाइटवर अनेक खास ऑफर्स सुरू आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही सर्व ऑफर्स आणि कूपन विभागात जाऊन त्यांच्याबद्दल जाणून घेऊ शकता आणि सूचीबद्ध किंमतीपेक्षा कमी किंमतीत उत्पादन खरेदी करू शकता.

वाचा : कर्करोग आणि मधुमेहापासून वाचवेल लाल कोबी; जाणून घ्या फायदे

तसेच खरेदी करताना उत्पादनाची तुलना करावी. कधीकधी एखाद्या कंपनीचे उत्पादन थोडे महाग विकले जाते. त्याचबरोबर दुसऱ्या कंपनीचे तेच उत्पादन स्वस्तात मिळते. अशा प्रकारे, आपण ते खरेदी करून खूप बचत करू शकता.

दरम्यान वस्तू खरेदी करताना उत्पादनाच्या कंपन्यांव्यतिरिक्त, इतर ई-कॉमर्स वेबसाइटवर त्या उत्पादनाच्या किंमतीची तुलना देखील केली पाहिजे. अनेक वेळा ते उत्पादन ई-कॉमर्स वेबसाइटवर कमी किमतीत उपलब्ध असते. त्याच वेळी, इतर ई-कॉमर्स वेबसाइटवर, तेच उत्पादन कमी किमतीत उपलब्ध आहे.