OnePlus Nord N30 SE 5G Price: आघाडीची कंपनी वनप्लसने आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. वनप्लसने फक्त भारतच नाही तर संयुक्त अरब अमिरातीमध्येही हा स्मार्टफोन लाँच केला आहे. OnePlus Nord N20 SE चा सक्सेसर म्हणून या मोबाईलला लाँच करण्यात आलं आहे. आधीच्या व्हर्जनच्या तुलनेत N30 SE मध्ये अनेक नवे अपडेट देण्यात आले आहेत.
हे डिव्हाइस MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरसह येतं. यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W च्या वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनमध्ये 50MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो.
कंपनीने या हँडसेटला एका कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केलं आहे. हा स्मार्टफोन 4GB RAM + 128GB स्टोरेजसह येतो. या मोबाईलची किंमत 13 हजार 600 रुपये आहे. हा फोन संयुक्त अरब अमिरातीमध्ये noon.com वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
हे मॉडेल वनप्लसच्या ग्लोबल वेबसाईटवरही लिस्ट आहे. कंपनीने Satin Black आणि Cyan Sparkle या दोन रंगात हा स्मार्टफोन लाँच केलं आहे. भारतात हा स्मार्टफोन लाँच कधी होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
OnePlus Nord N30 SE मध्ये 6.72 इंचाचा Full HD+ LCD डिस्प्ले देण्यात आलं आहे. स्मार्टफोन MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरोजचा पर्याय मिळतो. हा फोन अँड्रॉइन 13 वर आधारित Oxygen OS 13.1 वर काम करतो.
स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याची मुख्य लेन्स 50MP आहे. याशिवाय कंपनीने 2MP डेप्थ सेंसरही दिला आहे. फ्रंटला कंपनीने 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीसह येतो, जो 33W च्या SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
सुरक्षेसाठी मोबाईलमध्ये साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिलं आहे. स्मार्टफोन 5G, GPS, ब्ल्यूटूथ 5.3 आणि युएसबी टाइप सी कनेक्टिव्हिटीसह येतो.