OnePlus Nord CE ते POCO M3 Pro पर्यंत, 5 नवीन फोन या महिन्यात लाँच, जाणू घ्या फीचर

या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये भारतात दाखल झालेल्या काही सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमतीबद्दल आम्ही सांगणार आहोत. 

Updated: Jun 19, 2021, 03:54 PM IST
OnePlus Nord CE ते  POCO M3 Pro पर्यंत,  5 नवीन फोन या महिन्यात लाँच, जाणू घ्या फीचर title=

मुंबई : या महिन्यात भारतीय बाजारात बरेच मस्त आणि स्वस्त स्मार्टफोन बाजारात आले आहेत. OnePlus पासून Infinixपर्यंत अनेक कंपन्यांनी एक एक करून उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. आपण नवीन स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असल्यासल्या लोकांसाठी एक चांगली आणि महत्वाची बातमी आहे.

या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये भारतात दाखल झालेल्या काही सर्वोत्कृष्ट स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमतीबद्दल आम्ही येथे सांगणार आहोत. यात OnePlus Nord CE, iQOO Z3, POCO M3 Pro, Vivo Y73 2021 आणि  Infinix Note 10 Proचा समावेश आहेत. वैशिष्ट्ये आणि किंमत पाहून आपण आपल्या गरजेनुसार कोणताही स्मार्टफोन खरेदी करू शकता.

OnePlus Nord CE 5G

OnePlusने या महिन्यात आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Nord CE 5G लाँच केला. त्याची प्रारंभिक किंमत 22 हजार 999 रुपये आहे. परंतु आत्ता हे 1हजार रुपयांच्या सूटसह खरेदी केले जाऊ शकते. यात 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6.43 इंचाची  FHD+ AMOLED डिस्प्ले आणि Snapdragon 750G 5G आहे आणि त्याला 4,500mAh ची बॅटरी आहे.

या फोनवर मागील बाजूस दोन एमपी चे 64M प्राइमरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस एक 16MP कॅमेरा आहे. हे Android 11 वर कार्य करते. यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे.

iQ00 Z3

iQ00 Z3 5G भारतात तीन प्रकारांमध्ये दाखल करण्यात आला आहे. याची  किंमत 19 हजार 990 रुपये आहे. या फोनमध्ये 8GB आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. हा फोन 55W FlashCharge, 64MP प्राइमरी कॅमेरा, 16MP सेल्फी कॅमेरा, 6.58 इंचाचा फुल Full HD+ डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट आणि Qualcomm Snapdragon 768G  प्रोसेसरसह बाजारात आला आहे.

Poco M3 Pro

Pocoच्या पहिल्या 5G स्मार्टफोन Poco M3 Pro 5G ची  विक्री भारतात सुरू झाली आहे. हा फोन 13 हजार 999 रुपये किंमतीसह देशात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6GB RAM, 128GB स्टोरेज, 6.5 इंचाचा IPS LCD डिस्प्ले, 48 MP प्राइमरी आणि 8 MP सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह येतो आणि Android 11 वर कार्य करतो. यात 18W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.

Vivo Y73 2021

Vivo Y73 2021 फोन 10 जून रोजी भारतात लाँच झाला आहे. यात 8GB+3GB एक्सटेंडेड RAM, 128GB स्टोरेज, 4,000mAh बॅटरी असून 33W  फ्लॅशचार्ज सपोर्ट, 64 MP प्राइमरी कॅमेरा, 6.44 इंचाचा AMOLED, 16 MP फ्रंट कॅमेरा आहे. हे Octa Core MediaTek Helio G95 चिपसेटसह सुसज्ज आहे. त्याची किंमत 20 हजार 990 रुपये आहे.

Infinix Note 10 Pro

Infinix Note 10 Pro मध्ये 8 GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. यात 5,000mAh चार्जर, MediaTek Helio G85 प्रोसेसर, 64MP प्राइमरी कॅमेरा आणि 16MPच्या सेल्फी कॅमेरासह बाजारात उपलब्ध आहे. हा फोन 6.95 इंच Full HD+ डिस्प्लेसह आहे. या स्मार्टफोनची किंमत 16 हजार 999 रुपये आहे.