OnePlus 11 5G च्या पहिल्या सेलमध्ये बंपर डील, दर महिन्यात मोफत मिळणार 50GB डेटा, जाणून घ्या Features

OnePlus 11 5G खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आजपासून कंपनीला लेटेस्ट 5G फोन विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. 16GB RAM सह उपलब्ध असणारा हा फोन आज दुपारी 12 वाजल्यापासून अॅमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 256 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची किंमत 56,999 रुपये इतकी आहे. पहिल्या सेलमध्ये तुम्ही कमी किंमतीत हा फोन खरेदी करु शकता. 

Updated: Feb 14, 2023, 09:56 AM IST
OnePlus 11 5G च्या पहिल्या सेलमध्ये बंपर डील, दर महिन्यात मोफत मिळणार 50GB डेटा, जाणून घ्या Features title=

OnePlus 11 5g Sale: OnePlus 11 5G खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आजपासून कंपनीचा लेटेस्ट 5G फोन विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. 16GB RAM सह उपलब्ध असणारा हा फोन आज दुपारी 12 वाजल्यापासून अॅमेझॉन इंडिया आणि कंपनीच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. 256 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची किंमत 56,999 रुपये इतकी आहे. पहिल्या सेलमध्ये तुम्ही कमी किंमतीत हा फोन खरेदी करु शकता. 

हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्ही ICICI बँकेच्या कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 1 हजारांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. याशिवाय कंपनीच्या वेबसाईटवरुन फोन खरेदी केल्यास रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) युजर्सना 11,200 पर्यंतचे फायदा मिळणार आहे. यामध्ये प्रत्येक महिन्यात 50GB अतिरिक्त डेटाही सामील आहे. 

OnePlus 11 5G चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन 

फोनमध्ये 3216x1440 पिक्सल रेज्यूलेशनसह 6.7 इंचांचा QHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20.1:9 चा अॅस्पेक्ट रेशिओ आणि 120Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस देण्यात आला आहे. वनप्लसचा हा फोन 12 जीबीपर्यंतच्या LPDDR5x रॅम और 256जीबी पर्यंतच्या UFS 4.0 स्टोरेजसह उपलब्ध आहे. 

प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Adreno 740 GPU सह Snapdragon 8 Gen 2 देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये रिअरमध्ये LED Flash सह तीन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेंसरसह 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि एक 32 मेगापिक्सलच्या पोर्ट्रेट लेन्सचा सहभाग आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे .ही बॅटरी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचं झाल्यास तर फोन Android 13 वर आधारित ऑक्सिजन OS 13.0 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये WiFi 7, 5G, NFC, ब्लूटूथ 5.3 आणि USB 2.0 सारखे पर्याय देण्यात आले आहेत.