खूशखबर: OnePlus फोनवर तब्बल ४,००० रुपयांची सूट

तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, वनप्लस कंपनीने ग्राहकांसाठी एक ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 1, 2017, 07:42 PM IST
खूशखबर: OnePlus फोनवर तब्बल ४,००० रुपयांची सूट  title=
File Photo

नवी दिल्ली : तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, वनप्लस कंपनीने ग्राहकांसाठी एक ऑफर उपलब्ध करुन दिली आहे.

वनप्लस कंपनीला भारतात १००० दिवस पूर्ण होण्याच्या निमित्ताने एका खास सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. 'OnePlus १,००० Days' या ऑफरमध्ये कंपनीने ग्राहकांसाठी खास ४००० रुपयांची सूट दिली आहे.

वनप्लस ३टी या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना ४००० रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. ही ऑफर ५ सप्टेंबर २०१७ ते ७ सप्टेंबर २०१७ दरम्यान सुरु राहील.

OnePlus 3T या फोनची किंमत २९,९९९ रुपये आहे. मात्र, कंपनीतर्फे ४००० रुपयांची सूट मिळत असल्याने हा फोन २५,९९९ रुपयांत मिळणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांनी कॅश डिस्काऊंटसोबतच इतरही ऑफर्सचा फायदा घेता येणार आहे.

अॅक्सिस बँकेचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास २००० रुपयांपर्यंत कॅशबॅक ग्राहकांना मिळेल. तसेच जुना फोन एक्सचेंज केल्यास २००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. इतकेच नाही तर तुम्ही हा फोन कुठल्याही प्रकारचं व्याज न भरता हफ्त्यांवर खरेदी करु शकाल.

OnePlus 3T फोनचे फिचर्स

- होम बटनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर

- ५.५ इंचाची फुल एचडी स्क्रिन

- कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ४ प्रोटेक्शन

- ६ जीबी रॅम