'नोकिया ५'ची भारतात विक्री सुरू... जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

नोकियाच्या बहुप्रतिक्षित अॅन्ड्रॉईड नोकिया ५ स्मार्टफोनची भारतात विक्री सुरू झालीय. आजपासून देशातील १० शहरांतील रिटेल स्टोअरवर हा स्मार्टफोन उपलब्ध झालाय. 

Updated: Aug 15, 2017, 02:21 PM IST
'नोकिया ५'ची भारतात विक्री सुरू... जाणून घ्या फिचर्स आणि किंमत title=

मुंबई : नोकियाच्या बहुप्रतिक्षित अॅन्ड्रॉईड नोकिया ५ स्मार्टफोनची भारतात विक्री सुरू झालीय. आजपासून देशातील १० शहरांतील रिटेल स्टोअरवर हा स्मार्टफोन उपलब्ध झालाय. 

याअगदोर या फोनसाठी प्री-बुकींग सुरू होती. उल्लेखनीय म्हणजे हा स्मार्टफोन 'ऑनलाईन' खरेदी करता येणार नाही. 

नोकियाचे स्मार्टफोन्स बनवण्याचा अधिकार आता फिनलँडची कंपनी 'एचएमडी ग्लोबल'कडे आहे... आणि कंपनीनं तीन अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनसहित नोकिया ३३१० लॉन्च केलाय. दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, इंदोर, जयपूर, कोलकाता, लखनऊ, चंदीगड, पुणे, बंगळुरू आणि अहमदाबादमध्ये हा फोन उपलब्ध असेल. 

हा स्मार्टफोन ग्राहकांना १२,४९९ रुपयांमध्ये उपलब्ध होईल. केवळ मॅट ब्लॅक रंगात हा फोन उपलब्ध असेल.

नोकिया ५ चे फिचर्स

डिस्प्ले - ५ इंचाचा डिस्प्ले (पोलराइज्ड एचडी)

रॅम - २ जीबी

इंटरनल मेमरी - १६ जीबी (१२८ जीबीपर्यंत वाढवता येईल)

प्रोसेसर - MTK क्वॉडकोर, अॅन्ड्रॉईड नुगट

रिअर कॅमेरा - ८ मेगापिक्सल

फ्रंट कॅमेरा - ८ मेगापिक्सल (फ्लॅश, ऑटोफोकससहीत)

इतर फिचर्स - गुगल पर्सनल असिस्टंट