Nokia 2660 Flip: सध्याच्या स्मार्टफोन स्पर्धेत नोकिया मागे पडला असला तरी त्याचे चाहते अजूनही आहे. एकेकाळी या कंपनीने मोबाईलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यामुळे नोकिया कोणता फोन आणतंय? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचते. नोकिया कंपनीने 2660 फ्लिपच्या रिलीझसह युनायटेड किंगडममधील आपल्या जुन्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवलं आहे. नवीन फोल्डेबल नोकिया फोन एक मोठा कीपॅड, मोठ्या कंट्रोल की आणि वर्धित इंटरफेससह सादर केला आहे. नोकिया 2660 फ्लिपच्या माध्यमातून वृद्ध लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. श्रवणशक्ती कमी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हिअरिंग एड कंपॅटिबिलिटीसह येते. चला तर जाणून घेऊयात नोकियाच्या 2660 Flip फोनबद्दल...
नोकियाच्या फ्लिप फोनची बॅटरी 1,450mAh असून डिव्हाइस रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टमवर चालते. हा एक पॉवर सेव्हिंग ओएस आहे. एकदा बॅटरी चार्ज केली की, अनेक दिवस डिव्हाइसला पॉवर देऊ शकते. खरं तर, नोकिया 2660 फ्लिपचा स्टँडबाय टाइम काही आठवड्यांचा आहे. त्यामुळे एकदा फोन चार्ज केला की, वारंवार चार्ज करण्याची चिंता नाही. 2660 फ्लिप ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा फोन फ्लिप करण्यासाठी आणि कॉल प्राप्त करण्यासाठी उत्कृष्ट एर्गोनॉमिक्स देते. त्यामुळे मायक्रोफोन आणि इअरपीसच्या प्लेसमेंटबद्दल काळजी करण्याची गरज नाही. फोनमध्ये आपत्कालीन कॉल बटण देखील आहे. यामुळे नातेवाईकांशी सहजपणे संपर्क साधण्यासाठी केला जाऊ शकतो.
नोकिया 2660 फ्लिपची विक्री ऑगस्टच्या अखेरीस सुरू होईल आणि हा फोन निळा, काळा आणि लाल अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. नोकिया 2660 फ्लिप नोकिया चार्जिंग क्रॅडलद्वारे चार्ज केला जातो आणि स्वतंत्रपणे रु. 1,584 मध्ये विकला जातो. फोनची किंमत 5,228 रुपये इतकी आहे.