मुंबई : रिलायंसने जिओ लॉन्च करत टेलिकॉम क्षेत्रात भूकंप आणला. फ्री प्लानमुळे अनेक कंपन्यांना त्यांचे रेट कमी करावे लागले. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा झाला.
१३ महिन्यापूर्वीची ही घटना आता कोणीतरी बदलण्याचा प्रयत्न करत आहे. स्टार्टअप वायफाय ढाबाचे को-फाउंडर शुभेंदु शर्माने म्हटलं की, भारतात डेटाची किंमत खूप जास्त आहे. आम्हाला विश्वास होता की, जिओ लॉन्च झाल्यानंतर प्राईस वॉर होणार आणि अजूनही किंमती कमी होऊ शकतात.
वाय कोंबिनेटरच्या मदतीने हा स्टार्टअप खूपच स्वस्तात डेटा देणार आहे. या कंपनीचा डेटा पॅक अशा प्रकारे असणार आहे.
१०० एमबी - २ रुपये
५०० एमबी - १० रुपये
१ जीबी - २० रुपये
सगळे प्लान २४ तासासाठी असतील. जिओने १९ रुपयेमध्ये १५० एमबी आणि १.०५ जीबी ५२ रुपयामध्ये ऑफर आणली होती. जी प्रीपेड ग्राहकांसाठी आहे. हा डेटा प्रीपेड टोकनच्या रुपात मिळेल. हे टोकन बंगळुरुमधील टी-स्टॉल आणि दुकांनामध्ये मिळतील.
शर्मा यांनी म्हटलं की, आम्ही ग्राहकांना कोणताही अॅप डाऊनलोड करण्यासाठी नाही सांगणार. त्यांना फक्त आपल्या मोबाईल नंबरमध्ये एक पंच करावा लागतो. वेरिफिकेशनसाठी ओटीपी टाकावा लागेल. पंच केल्यानंतर ग्राहकांना याचा आनंद घेता येणार आहे.