मुंबई : चायनीज मोबाईल मेकर रिअलमी एका वर्षाच्या आता भारताची सगळ्यात मोठी स्मार्टफोन बनवणारी कंपनी म्हणून पुढे येत आहे. या यशानंतर रिअलमी लवकरच आपल्या स्मार्टफोनमध्ये मोठा बदल करणार आहे. रिअलमीच्या सीईओने गेल्याच आठवड्यात स्वत: चे ऑपरेटिंग सिस्टम आणत असल्याचं सांगितलं. सध्या कंपनी ओप्पोचा 'कलरओएस' वापरत आहे. रिपोर्टनुसार या वर्षाच्या शेवटपर्यंत रिअलमीचा नवीन ओएससमोर येऊ शकतो.
तसं तर कंपनीने ओएसच्या रिलीजबद्दल काही म्हटलेलं नाही. परंतू ही गोष्ट समोर आली आहे की, कंपनीच्या नवीन ओएसवर टेस्टिंग चालू आहे. रिअलमीचे सीईओ माधव यांनी गेल्या वर्षी ओपरेटिंग सिस्टमच्या डेव्हलपमेंट बद्दल सांगितले होते.
जी माहिती समोर आली आहे त्याप्रमाणे, रिअलमीचा ओएस ओप्पोच्या ओएसपेक्षा खूप वेगळा असू शकतो. जुलै २०१८ मध्ये रिअलमीने स्वत: ला ओप्पोशी वेगळे करून घेतले होते. तरं सॉफ्टवेअर आणि मेन्युफॅक्चरिंगसाठी रिअलमी अजून देखील ओप्पोच्या सुविधांचा वापर करत आहे.
अशी शक्यता आहे की, रिअलमीचा ओएस ऑक्सीजन ओएससारखा असेल. एका आणखी रिपोर्टप्रमाणे रिअलमीचा ओएस अॅन्ड्राइड Q बेस्ड असू शकतो. जर अस झालं तर, कंपनीचा ओएस रिलीज होण्यात वेळ लागू शकेल.
कंपनी लवकरच ६४ मेगापिक्सल्सचा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ६४ मेगापिक्सल्सच्या सेंसरचा स्मार्टफोन लॉन्च करण्यात कंपनीची टक्कर शाओमी आणि सॅमसंग सोबत आहे. तीनही कंपन्या लवकरात लवकर या स्मार्टफोनला बाजारात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.