फोटोज : २० वर्षानंतर रस्त्यांवर पुन्हा धावणार ही स्कूटर

 देशातील ऑटो मार्केटमध्ये लम्ब्रेटा पुन्हा दिसणार आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 11, 2017, 04:07 PM IST
फोटोज : २० वर्षानंतर रस्त्यांवर पुन्हा धावणार ही स्कूटर  title=

नवी दिल्ली : लम्ब्रेटा स्कूटर आपल्याला साधारण २० वर्षे मागच्या आठवणीत घेवून जाते. स्कूटर म्हटले की लम्ब्रेटा असे एक समीकरण त्याकाळी बनले होते. त्यावेळी लब्रेटा अनेकांच्या घरचा हिस्सा बनली होती. पण काही कारणामूळे २० वर्षाहून अधिक काळ ती बाजारात दिसलीच नाही.

पण आजही कोणी जुन्या स्कूटरवर रस्त्यावर दिसले तर  अचानक जुन्या आठवणी ताज्या होतात. पण जे लोक लम्ब्रेटावर आजही प्रेम करतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील ऑटो मार्केटमध्ये लम्ब्रेटा पुन्हा दिसणार आहे.

इटलीमध्ये सुरू असलेल्या मिलान मोटर शोमध्ये लॅम्ब्रेटा कंपनीच्या तीन नवीन स्कूटर पाहायला मिळाल्या. या स्कूटरवर लोकांच्या नजरा काही काळ खिळून राहिल्या. कंपनीने लम्ब्रेटाला नव्या फिचर्ससह बाजारात आणले आहे. शोमध्ये लोकांचा प्रचंड प्रतिसाद या स्कूटरला मिळाला. 

 

milan auto show, eicma show, lambretta scooter, lambretta, lambretta scooter launching, lambretta scooter unveling

 

खास इंजिन

व्ही ५० स्पेशल, व्ही १२५ स्पेशल आणि व्ही २०० स्पेशल नावाच्या तीन नवीन स्कूटर लम्ब्रटाने सादर केल्या आहेत. या तीन वेगवेगळ्या स्कूटरमध्ये वेगळी क्षमता असणारे इंजिन वापरले आहेत. कंपनीने दोन प्रकारचे फिक्स्ड फेंडर आणि फ्लेक्स फेंडरही यात दिले आहेत.

 

milan auto show, eicma show, lambretta scooter, lambretta, lambretta scooter launching, lambretta scooter unveling

 

२०१८ पासून जगभरात

एका अहवालाच्या मते, यावेळी लम्ब्रेटा स्कूटरची नवे मॉडेल तैवानमध्ये तयार केले जात असून  युरोपमध्ये त्यांची विक्री २०१८ पासून सुरू होणार आहे. इतर देशांच्या बाजारांमध्येही जून २०१८ पासून विक्रीस उपलब्ध असणार आहे. लॅमब्रटाचे तीन नवीन मॉडेल स्टील बॉडीवर आधारित आहेत. 

एलईडी लाईट

 तीनही लम्ब्रेटा व्ही स्पेशल स्कूटरमध्ये एलईडी लाइट देण्यात आले आहे. टेल लाईट आणि टर्न सिग्नल इंडिकेटर्समध्येही एलईडीचा उपयोग करण्यात आला आहे.

 चार्जिंग सॉकेट 

लम्ब्रेटा स्कूटरामध्ये १२ व्होल्ट चार्जिंग सॉकेट देण्यात आले आहे.

milan auto show, eicma show, lambretta scooter, lambretta, lambretta scooter launching, lambretta scooter unveling

 

व्हीस्पाशी तुलना 

 या तीनही स्कूटरची उंची ७७० मिमी इतकी आहे. त्यामूळे ही स्कूटर वेस्पा १२५ ची याबाबतीत साधर्म्य साधते. स्कूटरममध्ये व्हीलबेस १,३३० मिमी आहेत. म्हणजेच व्हिस्पापेक्षा १२५ मिमी जास्त आहे. 

टॉर्क 

मिलान शोमध्ये दिसत असलेल्या लॅम्बेट्रा व्हि ५० स्पेशलमध्ये ४९.५  सीसी एअर कूल्ड कार्ब्युरटेड सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे ३.५ अश्वशक्तीचे टॉर्क ७,५०० आरपीएम आणि टॉर्क ३.४ एनएम ६,५०० आरपीएम निर्माण करते. त्याचवेळी, दुसरे मॉडेल व्ही १२५ स्पेशलमध्ये १२४.७ सीसीच्या इंधन इंजेक्टेड इंजिनसह सुसज्ज आहे. हे ८,५०० आरपीएमवर १०.१ हॉर्सपॉवर निर्माण करते.
  
 लम्ब्रेटा व्ही १२५ स्पेशल ७००० आरएमपीवर ९.२ ची टॉर्क जनरेट करते. लम्ब्रेटा  व्ही २०० स्पेशलमध्ये १६८.९ सीसीचे विशेष इंधन आहे. हे इंजिन ७,५०० आरएमपी वर १२.१ हॉर्सपॉवरची क्षमता आणि ५,५०० आरएमपी आणि १२.५ टॉर्क निर्माण करते.
 
 तीनही स्कूटरना ६.५ लिटर इंधनाची टाकी दिली गेली आहे. २०१९ पर्यंत ही लम्ब्रेटा स्कूटर भारतीय बाजारपेठेत दाखल होईल अशी अपेक्षा आहे.