मुंबई : सोशल मीडियावर (social media) कधी काय व्हारल होईल हे सांगता येत नाही. कोरोना काळात अनेक जण घरी होते. आपल्याकडे रिकामी उद्योग करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. कोण काय करेल अन् व्हायरल होईल, याचा काही नेम नसतो. एकाच्या डोक्यातील थुकरटपणा हा कधी सोशल ट्रेंडचा विषय होतो हे कळत नाही. सध्या वॉटरमेलन मस्टर्ड चॅलेंजने (Watermelon Mustard Challenge) सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Netizens viral Watermelon Mustard Challenge on social media)
नक्की प्रकार काय?
सोशल मीडियावर सध्या कोणत्याही पदार्थासोबत विचित्र पदार्थ खाण्याचा प्रकार सुरु झाला आहे. उदाहरण म्हणजे चहासोबत संत्री, मॅगीसोबत पाव. असाच हा वॉटरमेलन मस्टर्ड चॅलेंज. यात नेटीझन्स कलिंगडाला मस्टर्ड सॉस लावून खात आहेत. इतकच नाही तर या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
हा विचित्र प्रयोगाचा व्हीडिओ यंग यूहने (Young Yuh) इंस्टाग्रामवर शेअर केला होता. यंग हा फूड ब्लॉगर आहे. यंगचा ‘yoyoyoyummy’ नावाचं फूड चॅनेल आहे. यंगने शेअर केलेल्या या व्हीडिओमध्ये कलिंगडाला मस्टर्ड सॉस लावून खाताना दिसत आहे. या व्हीडिओनंतर अनेक नेटीझन्सने हा प्रकार करुन पाहिला.
या विचित्र प्रकाराला समिश्र प्रतिसाद मिळत आहे. फक्त नेटीझन्सनच नाही तर सेलिब्रेटीही हा प्रकार करत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकन सिंगर लिजोने (Lizzo) हा प्रकार केला होता.
संबंधित बातम्या :
Mobile Hang: कोणते App मोबाईल करताय स्लो, असं तपासता येणार
WhatsApp चं धमाकेदार फीचर, आता एकाच वेळेस 4 स्मार्टफोनमध्ये चालवा तुमचं अकाऊंट