मुंबई : टीव्ही मालिकांमध्ये आता 'स्मार्ट' जमाना आला आहे. अनेक मोबाईल कंपन्या स्मार्ट फोननंतर आता स्मार्ट टीव्ही बनविण्यावर भर देत आहेत. एलजी, सोनी नंतर एमआय या मोबाईल कंपन्यांनी आपला स्मार्ट टीव्ही बाजारात उतरवला. आता मोटोरोलानेही आपला स्मार्ट टीव्ही बाजारात आणला आहे. याची विक्री आता भारतातही होणार आहे. मोटोरोला स्मार्ट टीव्हींची किंमत १३ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. तसेच महागडेही टीव्ही उपलब्ध आहेत.
Motorola नेही ‘अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही’ मालिका लाँच केली आहे. कंपनीने ३२ इंचापासून ६५ इंचापर्यंत सहा स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्टवर २९ सप्टेंबरपासून या टीव्हींची विक्री सुरू होणार आहे. अँड्रॉइड ९.० वर हे सर्व टीव्ही कार्यरत असतील.
Bring home a revolutionary viewing experience with the new range of Motorola TVs. Starting ₹13,999 onwards. Sale begins from 29th September on @Flipkart's #TheBigBillionDays! #RevolutionaryNotOrdinary
Click to know more: https://t.co/65uUwiI6cR pic.twitter.com/63EcuDYPzR— Motorola India (@motorolaindia) September 17, 2019
मोटोरोला स्मार्ट टीव्हीमध्ये एचडीआर फॉर्मेट आणि डॉल्बी व्हिजन स्टँडर्डचा सपोर्ट आहे. यात फ्रन्ट फायरिंग साउंडबार स्टाइल स्पीकर आहेत. विशेष म्हणजे या टीव्हींसोबत गेमपॅड देखील कंपनीकडून दिला जात आहे. याद्वारे युजर्स अँड्रॉइड टीव्ही प्लॅटफॉर्म आणि गुगल प्ले स्टोअरद्वारे गेम इंस्टॉल करुन टीव्हीवरच गेम खेळू शकतात.
मोटोरोला स्मार्ट टीव्हींची किंमत १३ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. तर ६४ हजार ९९९ रुपये इतकी या मालिकेतील सर्वात महागड्या टीव्हीची किंमत आहे. स्मार्ट टीव्हीच्या ३२ इंच (एचडी ७२० पिक्सल) व्हर्जनची किंमत १३,९९ रुपये आहे. तर, ४३ इंच (फुल-एचडी १०८० पिक्सल, २४,९९९ रुपये), ४३ इंच (अल्ट्रा-एचडी २१६० पिक्सल, २९,९९९ रुपये), ५० इंच (अल्ट्रा-एचडी २१६० पिक्सल, ३३,९९९ रुपये), ५५ इंच (अल्ट्रा-एचडी २१६० पिक्सल, ३९,९९९ रुपये) आणि ६५ इंच (अल्ट्रा-एचडी २१६० पिक्सल, ६४,९९९रुपये) इतकी किंमत आहे.