मुंबई : मोटोरोलाचा तगडा स्मार्टफोन लाँच करण्यात आलाय. मोटो झेड ३ या नावाने तो बाजारात उतरविण्यात आलाय. या स्मार्टफोनचे फीचर्स जबरदस्त आहेत. ६ इंचाचा हा फोन फुल एचडी प्लस ओल्ड डिस्प्ले आहे.
लेनोव्हो मालकीच्या मोटोरोलाने मोटो झेड ३ ला ५ जी मोटो मोड लाँच केला आहे. हा फोन शिकागोमधील एका कार्यक्रमात लाँच करण्यात आला. मोटोरालाने ५ जी नेटवर्कमध्ये प्रवेश करून जगातील पहिला स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
मोटो झेड ३ हा ६ इंच मॅक्स व्हिजन फुल एचडी + OLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्यात. फोनची बॉडी अॅल्युमिनियम आहे. २.५ डी आकार कॉर्निंग गोरिला ग्लास डिस्प्ले आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ ऑक्टा-कोर प्रोसेसरने संचलित केला जातो. हा फोन ४ जीबी रॅमचा असून ६४ जीबी स्टोरेज क्षमता आहे. तसेच ३००० mAh बॅटरी 8 आहे. हा फोन Googleलेन्सबरोबर दुहेरी स्मार्ट कॅमेरा सिस्टम आहे. तसेच हा फोन वॉटर प्रुफ कोटिंगचा आहे. फिंगरप्रिंट सेन्सर असून आणि अँड्रॉइड ओरियो ओएस यावर आधारित आहे.
मोटो झेड ३ यूएसमध्ये १६ ऑगस्टपासून २४ महिन्यांसाठी २० डॉलरपर्यंत उपलब्ध असेल. फोन रिटेलमध्ये ४८० डॉलरला उपलब्ध असेल. यूएसमध्ये २०१९ च्या सुरुवातीलाच हा फोन उपलब्ध असेल, असे कंपनीने म्हटले आहे.
डिस्प्ले - 6.1 inch Super AMOLED screen
ग्लास - Corning Gorilla Glass 3
रिझोल्युशेन - Full HD+, 2160 x 1080p Resolution
अॅन्ड्रॉईड सिस्टीम - Android 8.1, Oreo Operating system
प्रोसेसर - Qualcomm Snapdragon 835 Processor
रॅम - 4 GB RAM
स्टोरेज क्षमता - 64 GB Internal storage
स्टोरेज क्षमता वाढ - 2 TB microSD Expandable storage
कॅमेरा - 12 MP f2.0 Rear camera
फ्रंट कॅमेरा - 8 MP f2.0 Front camera
फ्रिंगर प्रिंट सेंसर - Fingerprint reader, face unlock
बॅटरी क्षमता - 3000 mAh non-removable Li-Ion