Mini Projector काही मिनिटातच घर बसल्या देईल सिनेमागृहाचा फील, किंमत वाचाल तर आजच घ्याल

मिनी प्रोजेक्टर तुमचे खूप पैसे वाचवेल आणि घरबसल्या सिनेमाचा अनुभव देईल.

Updated: Jul 28, 2022, 07:12 PM IST
Mini Projector काही मिनिटातच घर बसल्या देईल सिनेमागृहाचा फील, किंमत वाचाल तर आजच घ्याल title=

Flipkart Discount on Mini Palm Size Projector: मोठा रुपेरी पडदा, हातात पॉपकॉर्न आणि सोबत फॅमिली असा विकेंडला प्लान ठरतो. पण महागडी तिकीट पाहता आपल्या भावनांना आवर घालावा लागतो. त्यामुळे घरच्या घरी सिनेमागृहाचा फील यावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आता तुम्हाला घरीच सिनेगृहांसारखा आनंद लुटता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या एका मिनी प्रोजेक्टरबद्दल सांगणार आहोत. हे गॅझेट तुमचे खूप पैसे वाचवेल आणि घरबसल्या सिनेमाचा अनुभव देईल.

Zync S3 LED मिनी प्रोजेक्टर फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. हा प्रोजेक्टर दंडगोलाकार डिझाइनसह येतो आणि तुम्ही तुमच्या तळहातावरही ठेवू शकता. आकाराने लहान असूनही, त्याची पिक्चर क्वालिटी चांगली आहे. या माध्यमातून मोठा स्क्रीन प्रोजेक्ट करू शकता. चला तर मग या गॅझेटच्या किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

या प्रोजेक्टरमध्ये 480x360 रेझोल्यूशन मिळते, यासोबतच तुम्हाला यामध्ये 3000 ल्यूमिनसचा ब्राइटनेस मिळतो. या ब्राइटनेससह तुम्हाला उत्कृष्ट पिक्चर क्वालिटीचा अनुभव घेता येईल. यामध्ये तुम्हाला एलसीडी आणि एलईडी प्रोजेक्शन तंत्रज्ञान पाहायला मिळते. प्रोजेक्शन स्क्रीन 50 ते 100 इंच असून हॉलसाठी परिपूर्ण आहे. हा प्रोजेक्टर सहजपणे अॅक्सेस करू शकता. यासोबत एक रिमोट आणि AV केबल्स आणि अडॅप्टर दिले आहे.  या प्रोजेक्टरची खरी किंमत 4,999 रुपये असली तरी त्याच्या खरेदीवर तुम्हाला 24 टक्के सवलत दिली जात आहे. या मिनी प्रोजेक्टरची किंमत 3799 रुपये आहे.