मायक्रोमॅक्स कंपनी भारतात नवीन स्मार्टफोन आणण्यासाठी सज्ज

मायक्रोमॅक्स कंपनी #MadeByIndian आणि  #MadeForIndian या हॅशटॅगचा वापर करून पुन्हा नव्याने बाजारात उतरणार आहे.   

Updated: Jun 19, 2020, 02:52 PM IST
मायक्रोमॅक्स कंपनी  भारतात नवीन स्मार्टफोन आणण्यासाठी सज्ज title=

मुंबई : मायक्रोमॅक्स कंपनी भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या  तयारीत आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही भारतीय कंपनी आपले तीन नवे स्मार्टफोन बाजारात लाँच करणार आहे. त्यामधील एक फोन प्रीमियम फिचर्ससह कमी किंमतीत ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय हा फोन दिसायला मोटोरोला स्मार्टफोन सारखा असणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यापूर्वी कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या आगामी स्मार्टफोनबाबत कल्पना दिली आहे. 

iOne Note हा स्मार्टफोन मायक्रोमॅक्स कंपनीने  देशात लाँच केलेला अखेरचा फोन होता. या फोनची किंमत ८ हजार १९९ रूपये होती. परिणामी आता भारत-चीन वादानंतर भारत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मायक्रोमॅक्स कंपनी नवीन स्मार्टफोन बाजारात आणण्यासाठी सज्ज झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मायक्रोमॅक्स कंपनी लवकरच त्यांचे स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी आणणार आहे. शिवाय या तीन फोनची किंमत १० हजार रूपयांच्या कमी असणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी फोन खरेदी करण्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. 

मायक्रोमॅक्स कंपनी #MadeByIndian आणि  #MadeForIndian या हॅशटॅगचा वापर करून पुन्हा नव्याने बाजारात उतरणार आहे. शिवाय ट्विटरवर यासाठी नेटकऱ्यांकडून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.