मुंबई : कार बनवणारी कंपनी मारुतीनं ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली आहे. मारुतीच्या गाड्यांवर जुलै महिन्यामध्ये ग्राहकांना भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे. मारुतीच्या गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी कंपनीकडून ही ऑफर देण्यात येत आहे. हा डिस्काऊंट मारुतीच्या सगळ्या गाड्यांवर मिळत आहे. १० हजार रुपयांपासून ७० हजार रुपयांपर्यंत हा डिस्काऊंट देण्यात येणार आहे.
- अल्टोवर ३० हजार रुपयांचा डिस्काऊंट
- अल्टो K10 वर २७ हजार रुपयांचा डिस्काऊंट
- वेगनआर वर ३५ हजार रुपयांचा डिस्काऊंट
- सेलेरियोवर ३० हजार रुपयांचा डिस्काऊंट
- अर्टिगावर १५ हजार रुपयांचा डिस्काऊंट
- सियाजवर ७० हजार रुपयांचा डिस्काऊंट
- इग्निसवर ३० हजार रुपयांचा डिस्काऊंट
- डिझायरवर १५ हजार रुपयांचा डिस्काऊंट
- स्विफ्टवर १० हजार रुपयांचा डिस्काऊंट
कॅश डिस्काऊंटसोबतच मारुतीकडून एक्सचेंज बोनसही देण्यात येत आहे. वेगवेगळ्या गाड्यांवर १५ हजार ते ५० हजार रुपयांचा हा बोनस आहे. सगळ्यात जास्त फायदा इग्निस या गाडीवर होत आहे. इग्निसच्या खरेदीवर ७० हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि ५० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस असं मिळून १ लाख २० हजार रुपयांचा फायदा मिळत आहे.
मारुतीच्या गाड्यांच्या विक्रीमध्ये जून महिन्यात ३६ टक्के वाढ झाली होती. मारुतीनं जून महिन्यात १,४४,९८१ गाड्या विकल्या होत्या. तर जून २०१७ मध्ये कंपनीनं १,०६,३९४ गाड्यांची विक्री केली होती. छोट्या गाड्यांच्या श्रेणीमध्ये अल्टो, वॅगनआरची विक्री १५.१ टक्क्यांनी वाढून २९,३८१ झाली. स्विफ्ट, एस्टिलो, डिझायर आणि बलेनोची विक्री ७६.७ टक्क्यांनी वाढून ७१,५७० एवढी झाली. जुलै महिन्यातही विक्री वाढवण्यासाठी मारुती कंपनीनं डिस्काऊंट कायम ठेवला आहे. जूनमध्ये कंपनीनं डिस्काऊंट दिल्यामुळे विक्री वाढली होती.