आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकाने आणली बाथटब भरून नाणी (व्हिडिओ)

 'नाण्यांप्रती लोकांच मत बदलाव यासाठी असं केल्याचे' कोवालेंको सांगतो.

Updated: Nov 18, 2018, 08:46 AM IST
आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकाने आणली बाथटब भरून नाणी (व्हिडिओ)  title=

नवी दिल्ली : आयफोन घेण्यासाठी कोण काय करेल हे काही सांगता येत नाही. रुसमध्ये आयफोन ग्राहकाने जे काही केलंय ते ऐकून तुम्हीही अचंबित व्हाल. आयफोन XS विकत घ्यायला गेलेल्या ग्राहकाने दुकानदाराला एक बाथटब भरून नाणी दिली. या नाण्यांचं वजन 350 किलोग्रॅम होतं. या लोकांना या सर्वाचा व्हिडिओ देखील बनवलायं. रूसी ब्लॉगर स्व्यातोस्लव कोवालेंकोने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केलायं.

सुरक्षा रक्षकाने अडवलं 

काही लोक बाथटबमध्ये नाणी भरताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. कोवालेंकोने 1 लाख रुसी रुबल बाथटबमध्ये भरले.

या नाण्यांची एकूण किंमत 1हजार पाचशे अमेरिकन डॉलर म्हणजेच 1 लाख 8000 इतकी असून याचं एकूण वजन 350 किलोग्राम होतं.

सुरक्षा रक्षक हे कोवालेंको आणि त्याच्या ग्रुपला दुकानात येण्यास देत नसल्याचे या व्हिडिओत दिसतंय. यामध्ये चुकीचं काय आहे ? असं कोवालेंको त्यांना विचारतोय.

थोडा वेळ वाद घातल्यानंतर कोवालेंको आणि त्याच्या ग्रुपला नाण्यांनी भरलेल्या बाथटबसह आत सोडण्यात आलं.

दुकानदाराने स्वीकारली

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 #Ваннаме #Restore 

A post shared by Святослав Коваленко (@kovalenkosvyat) on

आयफोन दुकानदारही बाथटब भरून आणलेली नाणी घेण्यास तयार झाला. यानंतर दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांना नाणी मोजण्यासाठी 2 तास देण्यात आले.

यानंतर कोवालेंकोने 256 जीबी मॉडेलचा iPhone XS खरेदी केला. नाणी मोजतानाचे कर्मचाऱ्यांचे फोटो फेसबुकवर शेअर करण्यात आले. 'नाण्यांप्रती लोकांच मत बदलाव यासाठी असं केल्याचे' कोवालेंको सांगतो.

'जितके जण हा व्हिडिओ पाहतील तितक्यांना या बदलाचे' महत्व समजेल असेही त्याने सांगितले.