तुमच्याही फोनमध्ये आहेत 'हे' अ‍ॅप्स..डिलीट करा..बसेल मोठा फटका

अलीकडेच गुगलने प्ले स्टोअरवरून 50 पेक्षा जास्त अ‍ॅप्स काढून टाकले.अ‍ॅप्समध्ये जोकर मालवेअर असल्याचे आढळले आहे, जे विशेषतः Android डिव्हाइसेसना टारगेट केल जातं,त्यांमुळे    कंपनीने तात्काळ हे अ‍ॅप्स काढून टाकले आहेत

Updated: Jul 22, 2022, 03:28 PM IST
तुमच्याही फोनमध्ये आहेत 'हे' अ‍ॅप्स..डिलीट करा..बसेल मोठा फटका title=

आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे ,आपण स्मार्टफोनवर वेगवेगळे अ‍ॅप सर्रास वापरत असतो ,मात्र आपण जे अ‍ॅप्स वापरतोय ते सुरक्षित आहेत का ?असा प्रश्न कधी पडलाय का.नसेल पडला तर आता ही बातमी तुम्ही वाचलीच पाहिजे कारण काही अ‍ॅप्स असे आहेत जे तुम्हाला लाखोंचा गंडा घालू शकतात ,तुमची प्रायव्हेट माहिती चोरी करु शकतात.

 Android फोन युझर Google Play Store वरून अ‍ॅप डाउनलोड करतात. गुगल हे अ‍ॅप्स सिक्युरिटी चेक करूनच  Play Store वर उपलब्ध करून देत असले तरी, काहीवेळा स्कॅमर मालवेअर घालण्यासाठी आणि युझरचे पैसे आणि डेटा चोरण्यासाठी नवीन ट्रिक्स वापरले जातात. यासाठी ते  प्ले स्टोअरवर मालवेअर अ‍ॅप्स उपलब्ध करून दिले जातात.
कधीकधी स्कॅमर ऍप्लिकेशनमध्ये मालवेअर घालण्यासाठी आणि  पैसे,डेटा चोरण्यासाठी नवीन टेक्नीक्स वापरतात. 
गुगलने प्ले स्टोअरवरून अशा प्रकारचे 50 अ‍ॅप आतापर्यंत काढून टाकले आहेत.वापरकर्त्याचा डेटा आणि बँक अकाउंट हॅक होऊ शकतं

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच गुगलने प्ले स्टोअरवरून 50 पेक्षा जास्त अ‍ॅप्स काढून टाकले कारण ते मालवेअरने करप्ट झाले होते. , Zscaler च्या अहवालानुसार  प्ले स्टोअरवरमध्ये Joker, FaceStiller आणि Copper हे तीन मालवेअर असलेले अ‍ॅप्स सापडले आहेत.

अ‍ॅप्समध्ये जोकर मालवेअर असल्याचे आढळले आहे, जे विशेषतः Android डिव्हाइसेसना टारगेट केल जातं,त्यांमुळे  
 कंपनीने तात्काळ हे अ‍ॅप्स काढून टाकले आहेत

हा मालवेअर युझरचे SMS, कॉन्टॅक्ट लिस्ट आणि डिव्हाइसची माहिती चोरतो,  गुगलला या अ‍ॅप्सची तात्काळ सूचना देण्यात आली आणि कंपनीने ते काढून टाकले. माञ लाखो Android वापरकर्त्यांनी हे अ‍ॅप्स आधीच डाउनलोड केले आहेत.  अशा परिस्थितीत, जर तुम्ही यापैकी कोणतेही अ‍ॅप डाउनलोड केलेअसेल तर ते ताबडतोब मोबाइल फोनमधून काढून टाका.

 कोणते आहेत हे धोकादायक अ‍ॅप्स

 

 -  सिम्पल नोट स्कॅनर 
 (Simple Note Scanner)

-युनिव्हर्सल पीडीएफ स्कॅनर (Universal PDF Scanner)

-Private मेसेंजर  (Private Messenger) 

-प्रिमियम एसएमएस  (Premium SMS)

-स्मार्ट मेसीजेस  (Smart Messages) 

-क्लासिक गेम मेसेंजर(classic game changer)

- इमोजी एसएमएस (emoji sms)

- मेमरी सायलेंट कॅमेरा (memory silent camera)

-  थीम कीबोर्ड (theme keyboard)

-थीम फोटो कीबोर्ड (theme photo keyboard)

-थीम चॅट मेसेंजर (theme chat messanger)

- इन्स्टंट मेसेंजर (instant messenger)

- फॉन्ट इमोजी कीबोर्ड (font emoji keyboard)

- मिनी पीडीएफ स्कॅनर (mini PDF reader)

-स्मार्ट एसएमएस  (smart SMS)

- क्रिएटिव्ह इमोजी कीबोर्ड (creative emoji keyboard)

- फॅन्सी एसएमएस (fancy SMS)

- फनी इमोजी संदेश (funny emoji SMS)

 - मॅजिक फोटो एडिटर (magic photo editor)

- चॅट एसएमएस (chat SMS)

- स्माईल इमोजी (smiley emoji)

-हाय टेक्स्ट एसएमएस (ji-tech SMS)

- इमोजी थीम कीबोर्ड (emoji theme keyboard)

-टिक टॉक मेसेज (tik-tok SMS)

-टाइमस्टॅम्प कॅमेरा(timestamp camera)

- iMessager