मुंबई : महिंद्राची XUV500 ही गाडी भारतामध्ये लॉन्च झाली आहे. पेट्रोलवर चालणारी ही गाडी सिक्स-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्समध्ये उपलब्ध होणार आहे. महेंद्राची ही ‘G AT’ व्हेरियंट असणारी गाडी १५.४९ लाख रुपयांना(एक्स शोरूम दिल्ली) मिळणार आहे.
या गाडीला सिक्स-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सबरोबरच २.२ लिटरचं पेट्रोल इंजिन असणार आहे. महेंद्राच्या डिझेल गाडीप्रमाणेच हे इंजिन असेल. महिंद्रा XUV500 पेट्रोलचे फिचर्स XUV500 डिझेलप्रमाणेच आहेत.
महिंद्रा XUV500 पेट्रोलमध्ये 7.0 इंचांची इन्फोटेन्मेंट सिस्टिम(अॅन्ड्रॉईड ऑटोसह), क्रुज कंट्रोल, पुश बटन स्टार्ट आणि 8 वे ऍडजस्टेबल ड्रायवर सीट असणार आहे. सुरक्षेसाठी गाडीत रोलओव्हर मिटीगेशन(इएसपीसह), ड्युअल एअरबॅग्स असतील.
महिंद्रा XUV500 पेट्रोलही गाडी २०१८ या वर्षामध्ये जीप कंपासला टक्कर देईल, असं बोललं जात आहे. XUV500 पेट्रोलला कसा प्रतिसाद यावर महिंद्रा स्कॉर्पिओचं पेट्रोल मॉडेल आणायचं का नाही त्यावर निर्णय घेणार आहे.