नवी दिल्ली : इलेक्ट्रीक कार्सचं भविष्य ध्यानात घेऊन अनेक कंपन्या याकडे आवर्जून लक्ष देत आहेत. यात पाऊल पुढे टाकत देशातील प्रमुख ऑटो कंपनी महिंद्रा अॅन्ड महिंद्राने भारतात एक नवीन इलेक्ट्रीक कार लॉन्च केलीये.
Mahindra e2o Plus City Smart या कारची हरियाणातील एक्स-शोरूम किंमत ७.४६ लाख रूपये इतकी आहे. नवीन इलेक्ट्रिक Mahindra e2o Plus CitySmart या कारला एकदा चार्ज केल्यानंतर १४० किमीचं अंतर पार करू शकते. ही कार ८५ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावू शकते. ही कार महिंद्राच्या लेटेस्ट ड्राइव्हट्रेन तंत्रांवर आधारित इलेक्ट्रीक कार आहे.
महिंद्राची ही कार चार रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. ही कार Coral Blue, Sparkling Wine, Arctic Silver, Solid White रंगांमध्ये उपलब्ध असेल. महिंद्राच्या या ई२० प्लस सिटी स्मार्ट इलेक्ट्रीक कारच्या पी२, पी४ आणि पी६ व्हेरिएंटमध्ये ४८ व्होल्टची बॅटरी लावण्यात आली आहे. तर पी८ व्हेरिएंटमध्ये ७२ व्होल्टची बॅटरी देण्यात आली आहे.
४८ व्होल्टची ही बॅटरी ३ फेज इंडक्शन मोटर्सला पॉवर देते. यामुळे २५.५ बीएचपीची पावर आणि त्यातून ७० न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट होतो. तसेच ७२ व्होल्ट बॅटरीने ४० बीएचपीची पावर आणि ९१ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट होतो.
- टेलिमॅटिकच्या माध्यमातून रिमोट डायग्नोसिस
- स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी
- नवीन आणि अॅडव्हांस इन्फोटेन्मेंट सिस्टम
- रिजनरेटिव्ह ब्रेक्स
- हिल होल्ड कंट्रोल